नवी दिल्ली, 12 डिसेंबर : भारतात भाषांचं (Indian Languages) वैविध्य आहे. त्यातही जगभरात भारतीय भाषा नेहमीच पुढे राहिल्या आहेत. जगभरात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमधील तिसऱ्या क्रमाकांवर एक भारतीय भाषेचा समावेश आहे. अभिमानाची बाब म्हणजे जगभरात सर्वाधित बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये भारतातील अनेक भाषांचा समावेश आहे.
इथेनोलॉगच्या ताज्या अहवालानुसार जगातील पहिल्या दहा सर्वाधिक बोलल्या जाणार्या भाषांमध्ये हिंदी (Hindi) तिसर्या क्रमांकावर आहे. या यादीत बंगाली भाषा (Bangali Language) सातव्या स्थानावर आहे. जगभरातील 63 63..7 दशलक्ष लोक हिंदी भाषा बोलतात. इथेनोलॉगच्या अहवालानुसार हिंदीसह सर्वाधिक बोलणाऱ्या भाषेत मराठी (Marathi), बंगाली, तेलगू, तामिळ आणि पंजाबी या प्रमुख भाषा बोलल्या जातात. एवढेच नव्हे तर उर्दूचे मूल्यही वाढले आहे. जगातील पहिल्या वीस भाषांमध्ये उर्दूचा देखील क्रमांक लागतो. इथॅनोलॉगच्या अहवालात असे म्हटले आहे की, सध्या जगात 7,117 भाषा बोलल्या जातात आणि भारतात 456 भाषा बोलल्या जातात. जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या अशा 23 भाषा बोलल्या आहेत. जर आपण पहिली भाषा नेटिव्ह आणि नॉन-नेटिव्ह स्पीकर्सदृष्टीने पाहिलं तर मूळ भाषा इंग्रजी ही सर्वात मोठी भाषा आहे.
तर भारतीय भाषांमध्ये बंगालीला 26.5 कोटी, मराठीला 9.5 कोटी, तेलुगूला 9.3 कोटी, तमिळला 8.4 कोटी आणि पश्चिमी पंजाबीला 8.3 कोटी लोग बोलतात. इंग्रजी जगभरात 126.8 कोटी लोक आणि मेंडरिनला 112 कोटी लोग बोलतात. स्पेनिश आणि फ्रेंच जगभरात बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे. स्पॅनिश 53.8 कोटी आणि फ्रेंच 27.7 कोटी लोक बोलतात. इथनोलॉगच्या रिपोर्टनुसार आशियात 2,294 भाषा, आफ्रिकात 2,144 भाषा, पॅसिफिकमध्ये 1,313 भाषा आणि अमेरिकेत 1,061 भाषा बोलल्या जातात. तर जगभरात 2,926 भाषा अशा आहेत, ज्याचं अस्तित्व धोक्यात आले आहे.