मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

ब्रिटनमध्ये गूढ विषाणूने आरोग्य विभाग चिंतीत! मुलांमध्ये तीव्र हिपॅटायटीसचा प्रसार, WHO कडून तपास सुरू

ब्रिटनमध्ये गूढ विषाणूने आरोग्य विभाग चिंतीत! मुलांमध्ये तीव्र हिपॅटायटीसचा प्रसार, WHO कडून तपास सुरू

यूकेमध्ये एका रहस्यमय विषाणूमुळे मुलांमध्ये हिपॅटायटीसची प्रकरणे वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटना (WHO) हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. हेपेटायटीस ए, बी, सी, डी आणि ई विषाणूंशी संबंधित नसल्यामुळे आरोग्य अधिकारी याबद्दल विशेषतः चिंतित आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde
लंडन, 25 एप्रिल : गेल्या काही वर्षांपासून जगात आजारांचे चक्र चालू आहे. माणसाला एका आजाराचा सामना करण्यात यश मिळाले नाही तोच दुसरा नवीन आजार डोके वर काढतो. या वेळी जगभरातील डॉक्टर आणि आरोग्य सेवेशी संबंधित लोकं हिपॅटायटीसच्या गंभीर रुग्णांमुळे चिंतीत आहेत. हिपॅटायटीस हा यकृताचा आजार आहे, ज्यामध्ये यकृताला सूज येते. जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की अलीकडेच 130 हून अधिक नवीन प्रकारच्या हिपॅटायटीसचे रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, त्यापैकी बहुतेक ब्रिटनमधील आहेत. जानेवारीपासून ब्रिटनमध्ये गूढ विषाणूमुळे झालेल्या हिपॅटायटीसची 108 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. विशेष म्हणजे ही सर्व प्रकरणे लहान मुलांची आहेत. याशिवाय अमेरिका, इस्रायल, डेन्मार्क, आयर्लंड, नेदरलँड आणि स्पेनमध्येही गूढ विषाणूपासून होणारे हिपॅटायटीसचे प्रकरण नोंदवले गेले आहेत. हिपॅटायटीसची ही प्रकरणे इतकी गंभीर आहेत की अनेक मुलांनी यकृत प्रत्यारोपणाचाही सामना केला आहे. वैद्यकीय जगताशी संबंधित लोकही या प्रकरणांबद्दल चिंतेत आहेत. कारण, सामान्यतः उद्भवणार्‍या विषाणूमुळे असे होत नाही. A, B, C, D आणि E हे विषाणू सामान्यतः हिपॅटायटीस होण्यास जबाबदार असतात. Omicron Variant : आतापर्यंत ज्यांना कोरोनाची लागण झाली नाही, अशांसाठी चिंताजनक वृत्त! बार्सिलोनामधील हिपॅटोलॉजीच्या (hepatology) प्राध्यापिका आणि यकृत सार्वजनिक आरोग्य समितीच्या अभ्यासासाठी युरोपियन असोसिएशनच्या प्रमुख मारिया बूटी म्हणतात की हिपॅटायटीसची प्रकरणे अजूनही फारच कमी आहेत. पण हे सर्व मुलांशी संबंधित असल्याने ही बाब गंभीर आहे. हिपॅटायटीसच्या या प्रकरणांबद्दल, सार्वजनिक आरोग्य स्कॉटलंडचे संचालक जिम मॅकमिनामाइन म्हणाले की, हिपॅटायटीस अधिक गंभीर होण्यासाठी एडेनोव्हायरसचे (adenovirus) नवीन म्युटेशन कारणीभूत आहे का यावर आधीच संशोधन केले जात आहे. इतर काही विषाणू मिसळल्याने ही समस्या अधिक गंभीर होत आहे का? याचा अभ्यास आता शास्त्रज्ञ करत आहेत. तज्ज्ञ कोविड-19 सोबतही हा विषाणू असण्याची शक्यता शोधण्यात व्यस्त आहेत. मात्र, कोरोना लसीमुळे गंभीर हिपॅटायटीसची शंका फेटाळण्यात आली आहे. कारण या आजाराने बाधित झालेल्या इंग्लंडमधील मुले लसीकरणाच्या वयाखाली येत नाहीत. यामागचे एक कारण असेही सांगितले जात आहे की लॉकडाऊन दरम्यान सततच्या सामाजिक बदलांमुळे या मुलांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. त्यामुळे हिपॅटायटीस आजाराची तीव्रता वाढत आहे.
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या