Home /News /videsh /

तब्बल 2 महिन्यांनंतर घरी आली कोरोना योद्धा आई; मुलींनी काय केलं पाहा VIDEO

तब्बल 2 महिन्यांनंतर घरी आली कोरोना योद्धा आई; मुलींनी काय केलं पाहा VIDEO

9 आठवडे दूर राहिल्यानंतर या कोरोना योद्धा आईने आपल्या मुलींना सरप्राइज भेट दिली.

    ब्रिटन, 03 जून : एक दिवस जरी आपली आई (mother) आपल्यापासून दूर असेल तरी आपल्याला करमत नाही. मात्र सध्या डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी आपलं घरदार विसरून कोरोना रुग्णांसाठी झटत आहे. ज्या मुलांमध्ये त्यांचा जीव अडकलेला असतो, त्यांच्यापासूनही त्यांना दूर राहावं लागत आहे. अशीच एक कोरोना योद्धा जी तब्बल 9 आठवडे म्हणजे जवळपास 2 महिने आपल्या मुलींपासून दूर होती. कोरोना रुग्णांची सेवा करत होती. इतक्या दिवसांनी ती घरी परतल्यानंतर तिच्या मुलींची नेमकी काय प्रतिक्रिया होती, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, सुशी असं या कोरोना योद्धाचं नाव आहे. इंग्लंडच्या क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये काम करते. हे वाचा - या राज्याने केला रेकॉर्ड; कोरोनाला रोखण्यासाठी तब्बल 4.85 कोटी नागरिकांची तपासणी कोरोनाव्हायरसच्या उद्रेकात आपलं कर्तव्य बजावण्यासाठी ती आपली सात वर्षांची मुलगी हेटी आणि नऊ वर्षांची मुलगी बेला यांच्यापासून 9 आठवडे दूर होती. या दोन्ही मुली आपल्या मावशीकडे राहत होत्या. 2 महिने त्यांनी आपल्या आईला पाहिलं नव्हतं. सुशीने आपल्या मुलींना सरप्राइज भेट देण्याचं ठरवलं. आपली आई अचानक आपल्यासमोर येताच या मुलींची प्रतिक्रिया अशी होती. एका ट्विटर युझरने हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये या दोन्ही मुली सोफ्यावर बसलेल्या असतात, इतक्यात त्यांची आई त्यांच्या मागे येऊन राहते. आईचा आवाज ऐकताच एक मुलगी मागे बघते आणि ती शॉकच होते. आईला समोर पाहून त्यांना आधी विश्वासच बसला नाही, त्यानंतर त्यांच्या आनंदाश्रूंचा बांधच फुटला. हे वाचा - आता भारतात कोरोना रुग्णांना दिलं जाणार अमेरिकेचं औषध हा व्हिडिओ पाहताच ट्विटर युझर्सही भावनिक झालेत. कोरोना योद्धांना सॅल्युट करत त्यांच्या या मुलांचंही सर्वांनी कौतुक केलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या