मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अभिमानास्पद! भारतीय वंशाचे अनिल सोनी बनले WHO फाउंडेशनचे पहिले CEO

अभिमानास्पद! भारतीय वंशाचे अनिल सोनी बनले WHO फाउंडेशनचे पहिले CEO

सोनी हे जागतिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ समजले जातात.  अनिल सोनी (Anil Soni) एक जानेवारी 2021पासून मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.

सोनी हे जागतिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ समजले जातात. अनिल सोनी (Anil Soni) एक जानेवारी 2021पासून मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.

सोनी हे जागतिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ समजले जातात. अनिल सोनी (Anil Soni) एक जानेवारी 2021पासून मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.

   जिनिव्हा 08 डिसेंबर: भारतीय वंशाचे अनिल सोनी यांची जागतिक आरोग्य संघटना फाउंडेशनच्या (WHO Foundation) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (CEO) नियुक्ती  करण्यात आली आहे. सोनी हे जागतिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ समजले जातात. जागतिक आरोग्य संघटनेच्या या नव्या संस्थेचे अनिल सोनी हे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आहेत. जगभरात सर्वांना उत्तम आरोग्य लाभावं यासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशानं जागतिक आरोग्य संघटनेनं या फाउंडेशनची निर्मिती केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या उपक्रमाला पाठबळ देण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याचा फायदा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे ही सोनी यांची मुख्य जबाबदारी असणार आहे. कोरोना महासाथीच्या दरम्यान मे 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटना फाउंडेशनची सुरूवात करण्यात आली आहे. अनिल सोनी (Anil Soni) एक जानेवारी 2021पासून मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयेसेस (WHO Director-General Dr Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी सोनी यांचे वर्णन जागतिक आरोग्य क्षेत्रातील नवीन प्रयोग यशस्वी करणारे अर्थात ‘प्रूव्हन इनोव्हेटर’ असे केले आहे. एचआयव्ही एडस आणि यासारख्या संसर्गजन्य आजारांनी ग्रस्त लोकांसाठी त्यांनी 20 वर्षे काम केले आहे. आम्हाला Covid-19 ची लस मिळाली, आता पुढे काय? काय आहेत साइड इफेक्ट्स? क्लिंटन हेल्थ अॅसेस इनिशिएटिव्ह अंतर्गत ते आणि त्यांची टीम काम करत असताना, त्यांनी इथियोपियातल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या केंद्राच्या कामातही मोठे योगदान दिले. त्यांच्यावर पूर्ण विश्वास असून, खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रासाठी काम करण्याची त्यांची कौशल्ये लक्षणीय आहेत, असंही घेब्रेयेसेस यांनी म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organization) उद्दिष्ट आणि त्याच्यावर अवलंबून लाखो लोकांसाठी सोनी यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल, असेही त्यांनी नमूद केलं आहे. आपल्या नियुक्तीबाबत बोलताना सोनी म्हणाले, सध्या सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत सगळं जग संकटातून जात आहे. अनेक महिने कोविड 19शी लढा दिल्यानंतर आता त्यावरील लस उपलब्ध होण्याची आशा आहे. या परिस्थितीमुळे गेल्या काही महिन्यांत कर्करोगाच्या उपचारांमधील विलंब आणि एचआयव्हीवरील उपचारांपर्यंत अनेक बाबतीत तडजोड करावी लागली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं सुरू केलेल्या नवीन उपक्रमामुळे आता जागतिक आरोग्य विषयाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवीन आव्हाने हाताळण्यासाठी प्रत्येकाला आपलं योगदान देण्याची संधी मिळेल. जागतिक आरोग्य संघटना (WHO) फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. थॉमस झेल्टनर म्हणाले, जागतिक पातळीवरील सार्वजनिक आरोग्य क्षेत्राचा अभ्यास असणारे सोनी याचं नेतृत्व अतिशय प्रभावी आहे. ‘ग्लोबल हेल्थकेअर कंपनी वियाट्रिसमध्ये कार्यरत असताना अनिल सोनी यांनी एचआयव्ही एडस, टीबी अशा आजारांवरील उपचार पद्धती विकसित करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. क्लिंटन हेल्थ अॅक्सेस इनिशिएटिव्ह आणि ग्लोबल फंडमध्येही कार्यरत असताना त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. सार्वजनिक (Public), खासगी (Private), नफा न मिळवणाऱ्या (Non-profit) क्षेत्रातही अगदी शून्यातून संस्था उभारण्यात त्यांनी यश मिळवले आहे,’ असंही झेल्टनर यांनी म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटना फाउंडेशननं सोनी हे जागतिक आरोग्य सेवा क्षेत्रात मुरलेलं व्यक्तिमत्त्व आहे, असं म्हटलं आहे. अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आरोग्यसेवा उपलब्ध करण्यासाठी खासगी, सार्वजनिक आणि ना नफा संस्थाच्या माध्यमातून काम करण्याचा त्यांना दोन दशकांचा प्रदीर्घ अनुभव आहे. बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन, एमडीजी हेल्थ अलायन्स या संस्थामध्ये सल्लागाराची भूमिका पार पाडणारे अनिल सोनी जागतिक आरोग्य संघटनेच्या फाउंडेशनशी जोडले गेले आहेत, ही खूप महत्त्वाची बाब आहे, असंही फाउंडेशननं म्हटलं आहे. IMC 2020 : 'टेलिकॉम हब' होणार भारत, लवकरच 5G सुरू - पंतप्रधानांची घोषणा 2002 ते 2004 या काळात ग्लोबल फंडाचे सल्लागार ते कार्यकारी संचालक पदावर त्यांनी काम केलं. त्यानंतर 2004 ते 2005 या कालावधीत ते एफडीजीचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. एचआयव्ही, मलेरिया, टीबी या रोगांवरील उपचारांमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. मॅकेन्झी आणि हार्वर्ड कॉलेजचे माजी विद्यार्थी असणारे अनिल सोनी ‘द मार्शल प्रोजेक्ट’च्या संचालक मंडळावर आहेत. एक स्वतंत्र कायदेशीर संस्था म्हणून,  जागतिक आरोग्य संघटना फाउंडेशन जागतिक आरोग्यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहे. जगातील प्रमुख आरोग्य संघटना म्हणून जागतिक आरोग्य संघटनेची तटस्थता आणि स्वातंत्र्य या मूल्यांची जपणूक करत नवीन सार्वजनिक-खासगी गुंतवणुकीचे व्यासपीठ म्हणून हे फाउंडेशन कार्य करत आहे. फाउंडेशनने म्हटले आहे की, डब्ल्यूएचओ आणि यूएन फाउंडेशननं 2020 मध्ये सुरू केलेल्या कोविड-19 सॉलिडॅरिटी रिस्पॉन्स फंडाने 288 दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारण्यात यश मिळवलं आहे. याद्वारे जागतिक आरोग्य संघटनेला असलेला व्यापक पाठिंबा सिद्ध झाला आहे, असंही फाउंडेशननं म्हटलं आहे.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Who

  पुढील बातम्या