Super Spreader: ‘तो’ चर्चमध्ये प्रार्थनेला गेला आणि 180 जणांना कोरोना देऊन आला

Super Spreader: ‘तो’ चर्चमध्ये प्रार्थनेला गेला आणि 180 जणांना कोरोना देऊन आला

प्रार्थनेनंतरच्या दुसऱ्याच दिवशी त्या व्यक्तिला कोरोनाची लक्षणं दिसू लागली. त्यानंतर तो पॉझिटिव्ह निघाला. त्याच्या संपर्कात आलेल्यांमध्ये180 जण सापडले.

  • Share this:

न्यूयॉर्क 19 मे: जगभर कोरोनाचं थैमान सुरू आहे. बाधितांचा आकडा आता 50 लाखांच्या जवळ जातोय तर 3 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झालीय. माणसं एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळेच आज आजार सर्वात जास्त वेगाने पसरतो असं स्पष्ट झाल्याने जगभर सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र सरकारचं हे आवाहन धुडकावून लोक एकत्र येत असल्याने कोरोनाचा फैलाव जास्त वेगाने होत आहे. कॅलिफोर्नियात चर्चमधल्या प्रार्थनेत सहभागी होण्यासाठी गेलेली व्यक्ती ही कोरोना पॉझिटिव्ह निघाली आणि त्यामुळे तब्बल 180 जणांना कोरोनाची बाधा झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

अमेरिकेत संपूर्ण लॉकडाऊन करण्याला लोकांचा विरोध आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लोकांसाठी फक्त मार्गदर्शक तत्वेच जाहीर केली. घराच्या बाहेर पडू नका असं सरकारने सांगितलं होतं. मात्र अनेक चर्चेसमध्ये प्रार्थनेसाठी लोक जमू लागल्याने नवं आव्हान निर्माण झालं.

अमेरिकेत तर चर्चेस आणि धार्मिक संस्था विरुद्ध आरोग्य विभाग असा वादही सुरू झाला. हा युवक कॅलिफोर्नियातल्या एका चर्चमध्ये प्रार्थनेत सहभागी झाला होता. तिथे 200 पेक्षा जास्त जण जमले होते. प्रार्थनेनंतरच्या दुसऱ्याच दिवशी त्या व्यक्तिला कोरोनाची लक्षणं दिसू लागली. त्यानंतर तो पॉझिटिव्ह निघाला.

30 दिवसात सुधारा नाहीतर...', डोनाल्ट ट्रम्प यांनी WHOला पत्राद्वारे दिली धमकी

त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात आला तेव्हा हायरिस्क मध्ये 180 जण सापडले. त्या सर्वांच्या टेस्ट या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्या सर्वांना आयसोलेट करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन न केल्यामुळेच अशा घटना घडत असल्यानेच एकत्र येऊ नका असं सांगितलं जात असल्याचं अमेरिकन प्रशासनाने म्हटलं आहे.

हे वाचा -

वुहानमधली 'ती' स्पर्धा ठरली जगासाठी कोरोनाचा टाइम बॉम्ब, दिग्गज खेळाडूंचा खुलासा

अजब आंदोलन! पंतप्रधान येताच डॉक्टरांनी असं काही केलं की पाहून विश्वास बसणार नाही

 

First published: May 19, 2020, 2:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading