Home /News /videsh /

Russia Ukraine War: आधी हल्ला, नंतर गोळीबार...हॉस्पिटलमधून भारतीय विद्यार्थी हरजोत मागतोय मदतीचा हात

Russia Ukraine War: आधी हल्ला, नंतर गोळीबार...हॉस्पिटलमधून भारतीय विद्यार्थी हरजोत मागतोय मदतीचा हात

Russia Ukraine War: युक्रेनची (Ukraine) राजधानी कीवमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागल्याची माहिती काही वेळापूर्वी समोर आली. आता या घटनेची संपूर्ण माहिती पुढे आली आहे.

    कीव, 04 मार्च: युक्रेनची (Ukraine) राजधानी कीवमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागल्याची माहिती काही वेळापूर्वी समोर आली. आता या घटनेची संपूर्ण माहिती पुढे आली आहे. युद्धग्रस्त युक्रेनमधील लिव्ह (lviv) शहरातून बाहेर पडताना सुरुवातीला हल्ल्यात जखमी झालेल्या आणि नंतर गोळ्या लागलेल्या भारतीय विद्यार्थी हरजोत सिंह यानं (Harjot Singh Attacked in Ukraine) आपली आपबिती सांगितली आहे. त्यानं युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडे मदत मागितली आहे. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री व्हीके सिंह (VK Singh) यांनी शुक्रवारी युक्रेनची राजधानी कीवमध्ये गोळी लागल्यानं एक भारतीय विद्यार्थी जखमी झाल्याची पुष्टी केली होती. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी सिंह सध्या आपल्या शेजारचा देश पोलंडमध्ये आहेत. IND vs SL : 'हे तुमच्याशिवाय शक्य नव्हतं', 100 वी टेस्ट खेळताना विराट भावुक हरजोत सिंह यांचा मेसेज रविंदर सिंह यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. रविंदर सिंह खालसा एडचे संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांनी युक्रेनमधील भारतीय दूतावासाला ट्विट करून हरजोतसाठी मदत मागितली आहे. रविंदर सिंह यांनी शेअर केलेल्या मेसेजमध्ये हरजोतनं लिहिलं आहे की, माझे नाव हरजोत सिंह आहे आणि मी एक भारतीय विद्यार्थी आहे. जो युक्रेन मध्ये अडकला आहे. मी कारने युक्रेनमधील लिव्ह शहरात (lviv) जात होतो, तेव्हा वाटेत माझ्यावर पहिला हल्ला झाला आणि नंतर मला गोळी घालण्यात आली. एका रुग्णवाहिकेतून मला रुग्णालयात आणलं आणि आता मी कीव शहरात आहे. इथून भारतीय उच्चायुक्तालय वीस मिनिटांच्या अंतरावर आहे. मला तुझ्या मदतीची गरज आहे. कृपया मला येथून बाहेर पडण्यास मदत करा. व्ही के सिंग यांनी दिली होती माहिती व्ही के सिंग (General VK Singh) म्हणाले, कीवमधील एका विद्यार्थ्याला गोळी लागल्याची माहिती मिळाली असून त्याला तात्काळ कीवमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी विद्यार्थ्याला अर्ध्या वाटेतूनच कीव येथे उपचारासाठी नेण्यात आले. पोलंडमध्ये उपस्थित असलेले केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंह म्हणाले की, आम्ही जास्तीत जास्त भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. जखमी विद्यार्थ्याची ओळख पटवली जात आहे. यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. विद्यार्थी सध्या युक्रेनमधून युद्धग्रस्त देश सोडून भारतात सुरक्षित परतण्यासाठी पोलंडच्या सीमेवर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. चार केंद्रीय मंत्री, हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य एम सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्हीके सिंग, युक्रेनला लागून असलेल्या देशांमधील स्थलांतराच्या प्रयत्नांवर देखरेख करत आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Attack, Russia, Russia Ukraine, Ukraine news

    पुढील बातम्या