...आणि पोलंडच्या फर्स्ट लेडीने ट्रम्प यांचा 'पोपट' केला !

...आणि पोलंडच्या फर्स्ट लेडीने ट्रम्प यांचा 'पोपट' केला !

पोलंडच्या दौऱ्यावर असताना पोलंडच्या फर्स्ट लेडी अगाता डूडा यांच्याशी हात मिळवण्यासाठी ट्रम्प यांनी हात पुढे केला पण...

  • Share this:

ऑर्सा (पोलंड), 6 जुलै : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात आताही ते पोलंड दौऱ्यातील एक व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत आलेत.

त्याचं झालं असं की, ट्रम्प दाम्पत्य पोलंडच्या दौऱ्यावर असताना पोलंडच्या फर्स्ट लेडी अगाता डूडा यांच्याशी हात मिळवण्यासाठी ट्रम्प यांनी हात पुढे केला पण पोलंडच्या या फस्ट लेडीने ट्रम्प यांच्याशी हात न मिळवता सरळ पुढे गेल्या आणि त्यांनी अमेरिकेची फस्ट लेडी म्हणजेच ट्रम्प यांची पत्नी मेलानिया यांच्याशी शेकहॅण्ड केलं. या क्षणी ट्रम्प यांचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता. या अनपेक्षित प्रकारानं ट्रम्प हे देखील जरासे भांबावले. पण त्यानंतर अगाता यांनी तात्काळ ट्रम्प यांच्याशी शेकहॅण्ड केलं.

ट्रम्प जेव्हा पोलंड दौऱ्यावरुन परतत होते त्यावेळेसचा हा व्हिडिओ आहे.  त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. आतापर्यंत लाखो लोकांनी त्यांचा व्हिडिओ पाहिला आहे. दरम्यान, यानंतर पोलंडच्या राष्ट्रध्यक्षांनी याबाबत स्पष्टीकरणही दिलंय. फर्स्ट लेडी अगाता यांनी हे मुद्दामहून केलं नाही तर ही अनावधानानं झालेली चूक आहे.

First published: July 7, 2017, 11:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading