मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Haiti Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने हादरलं हैती, आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू

Haiti Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने हादरलं हैती, आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू

किनाऱ्यालगत असलेल्या भागाला भूकंपाचा हादरा बसला. 7.2 इतक्या रिश्टेर स्केलवर या भूकंपाची नोंद झाली आहे.

किनाऱ्यालगत असलेल्या भागाला भूकंपाचा हादरा बसला. 7.2 इतक्या रिश्टेर स्केलवर या भूकंपाची नोंद झाली आहे.

. 7.2 इतक्या रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद झाली आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू

पोर्ट ऑ प्रिंस, 14 ऑगस्ट : हैती शहरात (Haiti Earthquake ) भूकंपाचा मोठा धक्का जाणवला आहे. भूकंपामुळे हैती शहरात मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. अनेक घरं जमीनदोस्त झाली आहे. भूकंपाची तीव्रता ही 7.2 इतकी नोंदली गेली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हैती शहराच्या समुद्राच्या किनाऱ्यालगत असलेल्या भागाला भूकंपाचा हादरा बसला. 7.2 इतक्या रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद झाली आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू हे उत्तर पूर्वमध्ये 12 किलोमीटर दूर संत लुइस दु सुडमध्ये आहे. या बेटावर  व्हाइट हाउसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेकडून भूकंपग्रस्त भागात तातडीने मदत पूरवली जात आहे.

Pune : लग्नसमारंभात जास्त हळद लावण्यावरुन पती-पत्नीमध्ये वाद; एकाचा गेला जीव

पोर्ट ऑ प्रिंसमध्ये भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर लोक घराच्या बाहेर पडली. हादरा जाणवल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. लाखो लोक रस्त्यावर येऊन थांबले होते. तर काही जण घराच्या ढिगाराखाली अडकली गेली. आतापर्यंत यात 29 जणांचा मृत्यू झाला आहे.

सेना आमदार प्रकाश सुर्वेंच्या ऑफिसबाहेरचा पहिला VIDEO, कारमध्ये आढळले फटाके'हैती हे शहराने याआधीही भूकंप आणि अस्मानी संकटाचा सामना केला आहे. याआधी 2018 मध्ये 5.9 तीव्रतेचा भूकंप आला होता. त्यात 12 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर 2010 मध्ये 7.1 तीव्रतेचा भीषण भूकंप आला होता. यात 3 लाख लोकांचा मृत्यू झाला होता.

First published: