मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

हैतीमध्ये 7.2 तीव्रतेचा भूकंप; आतापर्यंत 304 जणांचा मृत्यू, 1800 हून अधिक जण जखमी, एक महिन्यासाठी आणीबाणी

हैतीमध्ये 7.2 तीव्रतेचा भूकंप; आतापर्यंत 304 जणांचा मृत्यू, 1800 हून अधिक जण जखमी, एक महिन्यासाठी आणीबाणी

Haiti Earthquake updates: हैती शहर (Haiti Earthquake ) भूकंपाच्या (Earthquake) मोठ्या धक्क्यानं हादरलं आहे. शनिवारी हैतीमध्ये 7.2 तीव्रतेचा भूकंप जाणवला.

  पोर्ट ऑ प्रिंस, 14 ऑगस्ट : हैती शहर (Haiti Earthquake ) भूकंपाच्या (Earthquake) मोठ्या धक्क्यानं हादरलं आहे. शनिवारी हैतीमध्ये 7.2 तीव्रतेचा भूकंप जाणवला. समोर आलेल्या माहितीनुसार, या भूकंपात तब्बल 304 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 1800 हून जास्त लोकं जखमी झालेत. पंतप्रधान एरियल हेनरी यांनी सांगितलं की, या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नासधूस झालं आहे. एक महिन्यासाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. हैती शहराच्या समुद्राच्या किनाऱ्यालगत असलेल्या भागाला भूकंपाचा हादरा बसला. 7.2 इतक्या रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद झाली आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू हे उत्तर पूर्वमध्ये 12 किलोमीटर दूर संत लुइस दु सुडमध्ये आहे. या बेटावर व्हाइट हाउसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेकडून भूकंपग्रस्त भागात तातडीने मदत पूरवली जात आहे. याआधीही भूकंप झालं होतं नुकसान हैतीमध्ये याआधीही भीषण भूकंप झाला होता. 2018 मध्ये 5.9 तीव्रतेचा भूकंप झाला होता. ज्यात 12 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर 2010 मध्ये 7.1 तीव्रतेच्या भूकंप दुर्घटनेत जवळपास तीन लाख लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हा देशाच्या राजधानीमध्ये मोठं नुकसान झालं होतं.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Earthquake

  पुढील बातम्या