मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

डॉक्टरांनी पायाचं चामडं काढून महिलेची तुटलेली जीभ जोडली; मात्र तोंडात केस उगवू लागल्यानं झाली अडचण

डॉक्टरांनी पायाचं चामडं काढून महिलेची तुटलेली जीभ जोडली; मात्र तोंडात केस उगवू लागल्यानं झाली अडचण

जीभेचा कॅन्सर (Tongue Cancer) झाल्याने त्यांची जीभ कापण्याची वेळ आली. मात्र, डॉक्टरांनी त्यांच्या पायाचे चामडे काढून कृत्रिमरित्या दुसरी जीभ जोडून दिली. डॉक्टरांनी शक्कल लढवून केलेला हा उपाय काही दिवसांनी एनाबेल यांच्यासाठी त्रासदायक ठरू लागला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

ब्रॉमली, 15 एप्रिल:  इंग्लंड (England) मधील अ‌ॅनाबेल लोविक (Annabel Lovick) नावाच्या एका 48 वर्षीय महिलेने जीवघेण्या कँन्सर (Cancer) शी यशस्वी सामना केला. मात्र, आता एक वेगळीच समस्या त्यांना सतावत आहे. अ‌ॅनाबेल यांच्या जीभेला कॅन्सर (Tongue Cancer) झाल्याने त्यांची जीभ कापण्याची वेळ आली. मात्र, डॉक्टरांनी त्यांच्या पायाचे चामडे काढून कृत्रिमरित्या दुसरी जीभ जोडून दिली. डॉक्टरांनी शक्कल लढवून केलेला हा उपाय काही दिवसांनी एनाबेल यांच्यासाठी त्रासदायक ठरू लागला आहे. पायाच्या चामडीनं जोडलेल्या जीभेवर आता केस उगवू लागल्याने अडचणी वाढल्या आहेत.

इंग्लंडच्या ब्रॉमली (Bromley) येथे राहणाऱ्या अ‌ॅनाबेल सोशल मीडियावरून लोकांना जीभेच्या कॅन्सर (Cancer of the tongue) बद्दल जागरूक करीत आहेत. इन्स्टाग्रामवर lovicklifecoach या नावाने अ‌ॅक्टिव्ह असलेल्या अ‌ॅनाबेल यांनी आपल्या या आजाराची कहाणी लोकांशी शेअर केली. दोन मुलांची आई असलेल्या अ‌ॅनाबेल यांच्यावर कॅन्सरमुळे जीभ कायमची गमावण्याची वेळ आली. पण, यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या पायाचे चामडे काढून त्यांची कृत्रिम जीभ बनविली होती.

जीभ जोडली, मात्र अडचणी वाढू लागल्या

डॉक्टरांनी अ‌ॅनाबेल यांना दुसरी जीभ जोडून दिली असली तरी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये खाताना ही जीभ लगेच थकून जायची, म्हणजेच खाताना जीभेची क्रिया मंदावायची. त्यांना बोलताना खाता-पिताना त्रास होत होता. मात्र, आता तर अडचणींमध्ये भरच पडली असून ट्रान्सप्लांट केलेली ही जीभ त्यांच्या पायाच्या चमड्यापासून बनवलेली असल्याने त्या जीभेवर आता केस उगवू लागले आहेत. यामुळे त्यांना खाण्या-पिण्याच्या समस्यांसह इतर त्रास सहन करावा लागत आहे. बोलताना जीभ थरथरते त्यांना साधे आईस्क्रीम खाणेही त्रासदायक ठरत आहे.

(हे वाचा-कोरोनाचं आता अधिक भयंकर रूप; RT-PCR टेस्टलाही देतोय चकवा)

कॅन्सर झाल्याचे तेव्हा कळाले...

अ‌ॅनाबेल यांना आपल्याला कॅन्सर झाल्याचे 2018 मध्ये समजले. पहिल्यांदा त्यांना मधुमेहाचा त्रास होता, त्यानंतर त्यांना वारंवार लघवी करण्याचा त्रास उद्भवू लागला. याप्रकारामुळे त्यांनी डॉक्टरांकडे जावून तपासणी केली असता त्यांच्या कँन्सरचे निदान झाले. औषधांनी काही दिवस आजार नियंत्रणात होता, मात्र 2020 मध्ये जीभेच्या कॅन्सरमुळे त्यांची जीभ कापावी लागली.

(हे वाचा-भारतात होणार नाही कोरोना लशीचा तुटवडा; Sputnik V चे महिन्याला 5 कोटी डोस)

ऑपरेशननंतर निर्माण झाली समस्या

शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी त्यांचे तीन दातही काढून टाकले, कारण चुकून त्यांनी नवीन जीभ चावू नये म्हणून. अ‌ॅनाबेल ल सुरुवातीला बर्‍याच समस्या आल्या, परंतु हळूहळू तिच्या शरीराने नवीन जीभ स्वीकारली. पण आता जीभेवर केस वाढू लागल्याने त्यांना अनकंपर्टेबल वाटत आहे. डॉक्टर या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सध्या प्रयत्न करत आहेत. तर एनाबेल इतर लोकांना अशी समस्या होऊ नये यासाठी जीभेच्या कँन्सरबद्दल जनजागृती करत आहेत.

First published:

Tags: Cancer, England, Health, Health Tips, International, Side effects