कोरोनासारख्या दिसणाऱ्या या बर्फाचा पाऊस फक्त मेक्सिकोतच नाहीत. तर जगभरात अनेक ठिकाणी होतो आहे. सोशल मीडियावर याचे फोटो शेअर केले जात आहे. एका इंटरनेट युजर्सने सौदी अरबमध्येही असा कोरोनासारख्या आकाराची बर्फवृष्टी होत असल्याची माहिती दिली आहे.Weird looking hailstones (ice balls from the sky) have fallen. They have a resemblance to the Nobel Coronavirus. pic.twitter.com/lnZR16yQOv
— Pramit Kumar (@PravatK84445021) May 19, 2020
हवामान विभागानं मात्र असा गारा पडणं हे सामान्य असल्याचं म्हटलं आहे. द मिररशी बोलताना हवामान तज्ज्ञ जोस मिगुएल विनस यांनी सांगितलं की, भरपूर जास्त वादळ असल्यास गारा इतक्या मोठ्या आकारांच्या होतात. कित्येक वेळा त्या एकमेकांना आपटतात किंवा एकमेकांना चिकटतात आणि यामुळे त्यांचा आकार वेडावाकडा होतो.Hailstone in Saudi Arabia in the shape of Coronavirus. pic.twitter.com/6z1G9w57K7
— Amira (@A_l_i_n_a__) May 13, 2020
हवामान तज्ज्ञांनी कोरोनासारखा दिसणारा हा गारा म्हणजे चिंतेचं कारण नाही, असं म्हटलं असलं, तरी आधीपासून कोरोनामुळे लोकं घाबरली आहेत, त्यांच्या मनात कोरोनाच्या भीतीनं घर केलं आहेत. त्यात आता कोरोनासारखीच बर्फवृष्टी होऊ लागल्याने लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. संकलन, संपादन - प्रिया लाडHailstone like #CoronaVirus #COVID__19 😯(Pictures from the Internet) pic.twitter.com/smGXhjxPu8
— 吳邢蠻Xingman Wu (@qwqaman) May 17, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus