हाफिज सईदच्या सुटकेचा मार्ग मोकळा

पाकिस्तानातील न्यायिक समीक्षा बोर्डाने बुधवारी दहशतवादी आणि जमता-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईदची नजरकैदेतून सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 23, 2017 10:34 AM IST

हाफिज सईदच्या सुटकेचा मार्ग मोकळा

 23 नोव्हेंबर:गेले 11 महिने नजरकैदेत असलेल्या हाफिज सईदच्या सुटकेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यालातीन दिवसांनी नऊ वर्ष पूर्ण होतील. मात्र त्याआधीच या हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदची सुटका होणार आहे. पाकिस्तानातील न्यायिक समीक्षा बोर्डाने बुधवारी दहशतवादी आणि जमता-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईदची नजरकैदेतून सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

सईद पुन्हा एकदा मोकाट सुटणार आहे. पाकिस्तान सरकारनं त्याला इतर कुठल्या प्रकरणात अडकवले नाही तर येत्या एक-दोन दिवसात तो मुक्त होईल. या वर्षीच्या जानेवारीपासून सईद नजरकैदेत होता. पण गेल्या महिन्यात पाकिस्तान सरकारनं सईद विरोधातले दहशतवादाचे आरोप काढले होते. त्यामुळे सईदला आता नजरकैदेत ठेवता येणार नाही. दहशतादाच्या नावाखाली नागरिकांना दहशतीखाली ठेवता येणार नाही, असा निर्वाळा तिथल्या कोर्टानं दिला. या निर्णयाचा सगळीकडूनच निषेध करण्यात येतो आहे. तर सैद समर्थकांनी त्याचे स्वागत केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 23, 2017 09:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...