हाफिज सईद पाकिस्तानात निवडणूक लढवणार

हाफिज सईद पाकिस्तानात निवडणूक लढवणार

मिल्ली मुस्लिम लीगची स्थापना काही वर्षांपूर्वी हाफिज सईदने केली. आतापर्यंत अनेक उमेदवार देऊन हाफिज सईदने लढवले. पण आता मात्र तो स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

  • Share this:

03 डिसेंबर: मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद आता निवडणूक लढवणार आहे. पाकिस्तानमध्ये 2018साली होणाऱ्या निवडणुका लढण्याचा निर्णय त्यानं घेतलाय.

मिल्ली मुस्लिम लीगची स्थापना काही वर्षांपूर्वी हाफिज सईदने केली. आतापर्यंत अनेक उमेदवार देऊन हाफिज सईदने लढवले.  पण आता मात्र तो स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.  मिल्ली मुस्लिम लिगकडून निवडणुकीत उतरणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याची पाकिस्तानतील एका  कोर्टाने त्याची सुटका केली.

26/11ला मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा  मास्टरमाईंड आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.सहा महिने तो नजरकैदेत होता. आता मात्र सुटका झाल्यानंतर भारताने  आणि अमेरिकेने  पाकिस्तानवर टीका केली आहे.  सध्या पाकिस्तानात नवाझ शरीफ यांना निवडणुस लढण्यास पाबंदी आहे. इम्रान खान विरोधात आहेत. अशा परिस्थितीत हफिज सईद यांना पाकिस्तान स्वीकारतो का हे पाहणं महत्तवाचं ठरेल.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2017 04:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading