कम्प्युटर नाही तर जलशुद्धीकरण प्रकल्प हॅक करण्याचा प्रयत्न; कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे बचावले नागरिक

शहराच्या जलशुद्धीकरण प्रक्रियेला लक्ष्य बनवुन हा हल्ला केला गेला असल्याचं समजत आहे.

शहराच्या जलशुद्धीकरण प्रक्रियेला लक्ष्य बनवुन हा हल्ला केला गेला असल्याचं समजत आहे.

  • Share this:

ओल्ड्स्मर, 9 फेब्रुवारी : एका हॅकरने फ्लोरिडातील एका शहराच्या जलशुद्धीकरण आणि प्रक्रिया प्रकल्पाची रिमोट अॅक्सेस सॉफ्टवेअर सिस्टीम (Remote Access Software System) हॅक (Hacking) करून पाण्यात घातक रसायन मिसळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे; मात्र यंत्रणेतल्या कर्मचाऱ्यांच्या सजगतेमुळे ही बाब वेळीच लक्षात आल्याने मोठा धोका टळला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. फर्स्ट पोस्टने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. फ्लोरिडातल्या ओल्ड्स्मर (Oldsmar) शहराची जलशुद्धीकरण व प्रक्रिया प्रकल्पाची (Wtare Treatment Plant) कम्प्युटर सिस्टीम एका अज्ञात व्यक्तीने शुक्रवारी हॅक केली आणि पाण्यात मिसळल्या जाणाऱ्या सोडियम हायड्रॉक्साइडचं (Sodium Hydroxide) प्रमाण 100 पार्ट्स पर मिलियनवरून (पीपीएम) 11,100 पीपीएमपर्यंत वाढवलं. पिनेलास काउंटीचे शेरीफ बॉब ग्वाल्टिएरी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सोडियम हायड्रॉक्साइड हे रसायन पाण्याची आम्लता (Acidity) कमी करण्यासाठी वापरलं जातं. तसंच, साबण आणि ड्रेन क्लीनर्समध्येही ते वापरलं जातं. जास्त प्रमाणात पाण्यात मिसळलं गेल्यास आणि शरीरात गेल्यास ते दाह निर्माण करतं आणि मोठ्या प्रमाणात गुंतागुंत होऊ शकते. हे ही वाचा-धक्कादायक! सोनं-हिरे नव्हे तर भारतीय प्रवाशाकडे सापडले तब्बल 3 हजार Viagra Pills दरम्यान, हॅकर कम्प्युटर सिस्टीमचा अॅक्सेस घेऊन तो सेटिंग्ज बदलत असल्याचं सुपरव्हायझरच्या लक्षात आलं. कारण त्याला कम्प्युटरच्या स्क्रीनवर माउस कर्सर फिरलेला दिसला. त्याने तत्क्षणी हस्तक्षेप करून यंत्रणेची सेटिंग्ज पूर्ववत केली. त्यामुळे हॅकरने बदल केल्यानुसार रसायन पाण्यात मिसळलं गेलं नाही. ओल्ड्स्मर हे 15 हजार लोकसंख्येचं शहर असून, टॅम्पाच्या आग्नेयेला 24 किलोमीटर अंतरावर आहे. या घटनेनंतर ओल्ड्स्मर येथील अधिकाऱ्यांनी रिमोट अॅक्सेस सिस्टीम बंद ठेवली आहे. रसायनाचं वाढलेलं प्रमाण पाण्यात मिसळलं जाण्यापासून वाचण्यासाठी आणखीही सुरक्षेचे काही पर्याय असल्याचं सांगण्यात आलं. त्या प्रदेशातल्या अन्य यंत्रणांनाही याची खबर देण्यात आली आणि त्यांच्या यंत्रणा तपासून घेण्यास सांगण्यात आलं. हे ही वाचा-क्या बात है आजी! 80 व्या वर्षी उणे 24 तापमानात करतात आइस स्केटिंग, पाहा VIDEO शुक्रवारी सकाळी आठ वाजता प्रकल्पातल्या कर्मचाऱ्याला एक अनपेक्षित कृती लक्षात आली. कारण कोणी तरी यंत्रणेचा ताबा घेतला होता; मात्र त्याला शंका आली नाही. कारण त्याचे सहकारी कर्मचारी अनेकदा दूरवरून ती यंत्रणा नियंत्रित करायचे; मात्र दुपारी दीड वाजता पुन्हा त्या यंत्रणेचा अॅक्सेस घेतला गेला आणि सोडियम हायड्रॉक्साइडचं प्रमाण वाढवलं गेलं. तो घुसखोर तीन ते पाच मिनिटं अॅक्टिव्ह होता; मात्र तो यंत्रणेतून बाहेर पडल्यावर तिथल्या कर्मचाऱ्याने तातडीने रसायनाचं प्रमाण पूर्ववत केलं. त्यामुळे धोका टळला, अशी माहिती शेरीफ ग्वाल्टिएरी यांनी दिली. ही बाब त्या कर्मचाऱ्याच्या नजरेतून सुटली असती, तरी मॅन्युअल मॉनिटरिंगसह अन्य यंत्रणांच्या ती वेळीच लक्षात आली असती आणि हॅकरने केलेल्या बदलानुसार रसायनं पाण्यात मिसळली गेली नसती, असंही ग्वाटिलिएरी यांनी सांगितलं. हा सायबर हल्ला (Cyber Attack) नेमका कुठून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एफबीआयसह सिक्रेट सर्व्हिस आणि पिनेलास काउंटीच्या शेरीफचं कार्यालय या प्रकरणाचा तपास करत आहे. हे देखील वाचा - धक्कादायक! सोनं-हिरे नव्हे तर भारतीय प्रवाशाकडे सापडले तब्बल 3 हजार Viagra Pills

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, छोट्या शहरांच्या पाणीपुरवठा किंवा अन्य यंत्रणांच्या कम्प्युटर यंत्रणा हॅकर्सद्वारे सहज लक्ष्य केल्या जाऊ शकतात. कारण छोट्या सरकारी यंत्रणांच्या कम्प्युटरशी संबंधित पायाभूत सुविधांवर जास्त निधी खर्च केला जात नाही. ड्रॅगॉस सिक्युरिटीचे सीईओ आणि या विषयातले तज्ज्ञ रॉबर्ट ली यांनी सांगितलं, की पाणी प्रक्रिया प्रकल्प रिमोट कंट्रोल सिस्टीमने सर्रास चालवले जाऊ लागले आहेत. त्यामुळे अनेक गुन्हेगार अशा ठिकाणांना लक्ष्य करू लागले आहेत. फायरआय नावाच्या सायबरसिक्युरिटी फर्मने गेल्या वर्षी अशा प्रकारांत वाढ झाल्याचं निरीक्षण नोंदवलं; मात्र बहुतांश प्रकरणांमध्ये काहीही नुकसान झालेलं नसून, ही यंत्रणा कशी आहे हे समजून घेण्यासाठी असं हॅकिंग झालं होतं, असं त्यांचं निरीक्षण आहे.

हे देखील वाचा -  Corona प्रसाराचं कारण काय? वुहानच्या मार्केटमध्ये WHOला मिळाले नवे संकेत

हार्वर्डचे सायबरसिक्युरिटी (Cyber Security) फेलो ताराह व्हीलर यांनी असोसिएटेड प्रेसला ई-मेलद्वारे सांगितलं, की पाण्यासारख्या महत्त्वाच्या संपत्तीचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणेबाबत योग्य ती काळजी घेणं अत्यावश्यक आहे. अशा प्लांट्सची काळजी अगदी स्वतःच्या वैयक्तिक किचनप्रमाणे घेतली पाहिजे. स्थानिक पातळीवर नेटवर्क्स तयार करताना योग्य प्रकारे कॉन्फिगरेशन न करण्याचा धोका ओळखला जात नाही. गेल्या काही काळात अमेरिकेच्या औद्योगिक यंत्रणांमध्ये, पॉवर ग्रिड, तसंच मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्समध्ये रशिया पुरस्कृत हॅकर्सनी घुसखोरी करण्याचे प्रकार घडत आहेत. न्यूयॉर्कमधल्या उपनगरी धरणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न इराणी हॅकर्सनी केल्याचं 2013मध्ये उघड झालं होतं. यापैकी कोणत्याच प्रकरणात हानी झाली नव्हती; मात्र अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे, की परकीय शक्तींनी सॉफ्टवेअर रूपातले काही सापळे लावले असून, त्यातून सशस्त्र लढायाही होऊ शकतात.
Published by:Aditya Thube
First published: