एचवनबी व्हिसा धारक पती/पत्नी अमेरिकेत नोकरीसाठी अपात्र; ट्रम्प सरकारचा नवा फतवा

त्यानुसार एचवन-बी व्हिसाधारकाच्या पती अथवा पत्नीला भविष्यात अमेरिकेत काम करता येणार नाही.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 17, 2017 05:05 PM IST

एचवनबी व्हिसा धारक पती/पत्नी अमेरिकेत नोकरीसाठी अपात्र; ट्रम्प सरकारचा नवा फतवा

17 डिसेंबर: ओबामा सरकारने घेतलेले निर्णय एकापाठोपाठ एक रद्द करण्याचा धडाकाच ट्रम्प सरकारने लावला आहे. ओबामा केअर आणि नेट न्यूट्रॅलिटीपाठोपाठ आता एचवन-बी व्हिसाचे नियम आणखी कडक करण्याचा विचार ट्रम्प सरकार करीत आहे. त्यानुसार एचवन-बी व्हिसाधारकाच्या पती अथवा पत्नीला भविष्यात अमेरिकेत काम करता येणार नाही.

अमेरिकेत २०१५ पासून ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत असणाऱ्या 'एचवन-बी'धारकांच्या पती अथवा पत्नीला एच फोर डिपेंडंट व्हिसावर नोकरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ट्रम्प सरकारने हा निर्णय घेतल्यास त्याचा फटका ग्रीन कार्डसाठी प्रयत्न करणाऱ्या कुशल नोकरदारांना बसण्याची शक्यता आहे. गुरुवारी यूएस डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीतर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या निवेदनात निर्णयाची तपशीलवार माहिती देण्यात आलेली नाही.

ट्रम्प सरकारच्या 'बाय अमेरिकन; हायर अमेरिकन' या धोरणांतर्गत व्हिसा नियम कडक करण्याचा सरकारचा विचार सुरु असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. 'डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीतर्फे' जारी करण्यात आलेल्या निवेदनात ट्रम्प सरकारच्या एचवन-बी व्हिसाच्या संदर्भातील धोरणाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 'डीएचएस'च्या मते एचवन-बी व्हिसाप्राप्त कुशल नोकरदारांची पात्रता पुन्हा एकदा पडताळून पाहण्यात येणार आहे.

ट्रम्प सरकारच्या या धोरणामुळे अमेरिकेत कार्यरत भारतीयांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2017 05:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...