S M L

अमेरिकेत एच-४ व्हिसाधारकांना वर्क परमिट मिळणं होणार बंद

तुमचे कुणी नातेवाईक अमेरिकेत डिपेंडंट म्हणून गेले असतील, तर त्यांना तिथे नोकरी करणं जवळपास अशक्य होणार आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 26, 2018 02:48 PM IST

अमेरिकेत एच-४ व्हिसाधारकांना वर्क परमिट मिळणं होणार बंद

मुंबई, ता. 26 मे : तुमचे कुणी नातेवाईक अमेरिकेत डिपेंडंट म्हणून गेले असतील, तर त्यांना तिथे नोकरी करणं जवळपास अशक्य होणार आहे. कारण ट्रम्प प्रशासन तशी तरतूद करतंय. काम अंतिम टप्प्यात पोहोचतंय. एच-४ व्हिसाधारकांना वर्क परमिट मिळणं बंद होणार आहे.

अमरिकेत ज्या परदेशी नागरिकांना एच-४ व्हिसा मिळालाय, त्यात ९३ टक्के लोक भारतीय आहेत. डिपेंडंट म्हणून अमेरिकेत जाणाऱ्यांना एच-४ व्हिसा मिळतो. तिथे जाऊन त्यांना आतापर्यंत काही प्रकारच्या नोकऱ्या करता यायच्या. त्यामुळे मिळकतीत भर पडायची, आणि वेळही जायचा. पण अमेरिकन लोकांना रोजगार मिळावा, या सबबीखाली ट्रम्प प्रशासनानं हा आततायी निर्णय घेतला आहे.

पाहूयात नेमकं हे एच-४ व्हिसा प्रकरण काय आहे

- H1-B व्हिसाधारकांच्या पती/पत्नीला H-4 व्हिसा मिळतो

- डिपेंडंट व्हिसा असंही म्हणतात

Loading...
Loading...

- आतापर्यंत H-4 धारकांना नोकरी करता यायची

- ओबामा प्रशासनानं तशी तरतूद केली

- यामुळे H1-B धारकांना अमेरिकेत रहाणं आकर्षक वाटायचं

- मिळकतीत भर पडायची, वेळही जायचा

- ट्रम्पना हे मान्य नाही, अमेरिका फर्स्टचा नारा

- डिपेंडंट श्रेणीतल्यांना आता वर्क परमिट मिळणार नाही

- 70 हजार जणांना फटका

- जवळपास 63 हजार भारतीयांचं नुकसान

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 26, 2018 02:48 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close