काबूल पुन्हा हादरलं, विद्यापीठात ISच्या आत्मघातकी हल्ल्यात 22 ठार, अंदाधुंद गोळीबार VIDEO

अफगाणिस्तानच्या दहशतवादविरोधी लढ्याला आमचा पाठिंबा कायम राहिल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

अफगाणिस्तानच्या दहशतवादविरोधी लढ्याला आमचा पाठिंबा कायम राहिल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

  • Share this:
    काबूल 02 नोव्हेंबर: अफगाणिस्तानची राजधानी काबूल सोमवारी आत्मघातकी हल्ल्याने हादरून गेली. तिथल्या विद्यापीठात (Kabul University) इस्लामिक स्टेटने (IS) केलेल्या हल्ल्या हल्ल्यात 22 जण ठार झाले. त्यात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हल्लेखोराने विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करून स्वत:ला स्फोटकांनी उडवून दिलं आणि नंतर त्याच्या सोबत असलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात या 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहीती आहे. हा हल्ला एवढा भीषण हल्ला होता की अनेकांना तिथलं दृश्य पाहूनच चक्कर आली. क्लास रुम्समध्ये रक्ताचे पाट वाहत होते. अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. स्फोटानंतर गोळीबार झाल्याने अनेकांचा जीव गेला आणि अनेक जण जखमी झालेत. विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी आश्रय घ्यायलाही उसंत मिळाली नाही. आठवडाभरात काबूलमधल्या शैक्षणिक संस्थांमध्ये झालेला हा दुसरा हल्ला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.  अफगाणिस्तानची शांतता भंग करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. अफगाणिस्तानच्या दहशतवादविरोधी लढ्याला आमचा पाठिंबा कायम राहिल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अफगाणिस्तान सरकार आणि तालिबानमध्ये अमेरिकेच्या पुढाकाराने शांतता चर्चा सुरू आहे. त्या चर्चेत विघ्न निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published: