• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • विद्यापीठात अंधाधुंद गोळीबार; 8 जणांचा मृत्यू, बचावासाठी रशियातील विद्यार्थ्यांनी खिडकीतून घेतल्या उड्या, VIDEO

विद्यापीठात अंधाधुंद गोळीबार; 8 जणांचा मृत्यू, बचावासाठी रशियातील विद्यार्थ्यांनी खिडकीतून घेतल्या उड्या, VIDEO

सोमवारी रशियन शहर पर्ममधील एका विद्यापीठात एका बंदूकधारी व्यक्तीने गोळीबार केला. त्यात 8 जण ठार झाले आणि सहा जण जखमी झाले.

 • Share this:
  नवी दिल्ली 20 सप्टेंबर : एका अज्ञात व्यक्तीने सोमवारी रशियन विद्यापीठात गोळीबार केला (Gunman Opened Fire in Russian University). या अचानक झालेल्या गोळीबारात 8 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सोमवारी रशियन शहर पर्ममधील एका विद्यापीठात एका बंदूकधारी व्यक्तीने गोळीबार केला. त्यात 8 जण ठार झाले आणि सहा जण जखमी झाले. तीन वर्षांच्या मुलामुळे लागला हत्येचा सुगावा; म्हणाला, बाबांनी आईला खूप मारलं! विद्यापीठाचे प्रवक्ते आणि पोलिसांनी सांगितलं, की मॉस्कोच्या 1,300 किलोमीटर (800 मैल) पूर्वेला पर्म स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये घडलेल्या घटनेनंतर बंदूकधारीला ताब्यात घेण्यात आले. स्थानिक माध्यमांनी प्ले केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये विद्यार्थी इमारतीतून बाहेर पडण्यासाठी पहिल्या मजल्यावरील खिडक्यांमधून उड्या घेताना दिसत आहेत. जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी खिडकीतून उड्या घेत याठिकाणाहून पळ काढला. निर्दय! प्रियकरासोबत गेली होती पळून, सासरी परतण्यासाठी दिला पोटच्या मुलांचा बळी रशियामधील मोठ्या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या एजन्सीनं सांगितलं, की बंदूकधारी व्यक्ती विद्यापिठातील एक विद्यार्थी असल्याचं समोर आलं आहे. रशियातील नागरिकांना बंदूक स्वतःजवळ बाळगण्यास परवानगी नाही. मात्र, शिकार, स्वरक्षण आणि खेळासाठी ती खरेदी करू शकतात.
  Published by:Kiran Pharate
  First published: