अमेरिकेत डेनवर शहरात गोळीबार;एकाचा मृत्यू

अमेरिकेत डेनवर शहरात गोळीबार;एकाचा मृत्यू

वॉलमार्ट डिपार्टमेंटल स्टोरच्या एका शाखेत ही घटना घडली आहे.या घटनेने अमेरिकेत खळबळ माजली आहे.

  • Share this:

कोलोरॅडो,02 नोव्हेंबर: अमेरिकेच्या डेनवर शहरात गोळीबार झालाय. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचं समजतंय, तर एक जण गंभीर जखमी आहे. वॉलमार्ट डिपार्टमेंटल स्टोरच्या एका शाखेत ही घटना घडली आहे.या घटनेने अमेरिकेत खळबळ माजली आहे.

हा हल्ला 2 लोकांनी केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांचा शोध सुरू आहे. डेनवरपासून जवळ असलेल्या थॉर्नटनमध्ये हा प्रकार घडलाय. याआधी कालच अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात दहशतवादी हल्ला झाला होता. तो हल्ला एक दहशतवादी हल्ला होता. त्यात आठ लोकांना एका ट्रक ड्रायव्हरने ट्रक खाली चिरडलं होतं. त्यामागे आयसिसचा हात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती.

त्यापाठोपाठ आता डेनवरमधली ही घटना. हा दहशतवादी हल्ला नसून गन व्हॉयलेन्सचा प्रकार असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. अमेरिकेत हल्ली अशा घटना वारंवार होऊ लागल्या आहेत. याला लोन वुल्फ अटॅक असं म्हणतात. म्हणजे हल्ला करणारी टोळी नसते. एकटी व्यक्ती घातपात करायचं ठरवते आणि शक्य तितकं नुकसान करते.

First published: November 2, 2017, 8:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading