S M L

अबब, 4.35 फुटाचे पाय अन् उंची फक्त 6 फूट 9 इंच !, माॅडेलची गिनीज रेकाॅर्डला गवसणी

या माॅडेलचे पाय जगात सर्वात लांबीचे ठरले आहे. या माॅडेलचे पाय चक्क 4 फूट 35 इंच इतके लांब आहे.

Sachin Salve | Updated On: Sep 13, 2017 09:58 PM IST

अबब, 4.35 फुटाचे पाय अन् उंची फक्त 6 फूट 9 इंच !, माॅडेलची  गिनीज रेकाॅर्डला गवसणी

13 सप्टेंबर : 'कुणाचा पायगुण चांगला असतो' असं आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं. पण, एका रशियन माॅडेलच्या पायावर गिनीज बुक आॅफ रेकाॅर्डची नोंद झालीये. या माॅडेलचे पाय जगात सर्वात लांबीचे ठरले आहे. या माॅडेलचे पाय चक्क 4 फूट 35 इंच इतके लांब आहे.

एकाटेरिना लिसिना असं या रशियन माॅडेलचं नाव आहे. तिच्या उजव्या पायाची लांबी ही तब्बल 132.8 सेंटीमिटर म्हणजेच 52.2 इंच आहे. तर डाव्या पायाची उंची ही 132.2 सेंटीमिटर म्हणजेच 52 इंच आहे.


एकाटेरिनाच्या कुटुंबात प्रत्येक सदस्याची उंचीचा आहे. तिच्या भावाची उंची 6 फूट 6 इंच आहे. तर वडिलांची उंची 6 फूट 5 इंच आहे. तर आईची उंची सुद्धा 6 फूट 1 इंच आहे.  

आपल्या पायामुळे आपली गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल एकाटेरिनाने आनंद आणि अभिमान व्यक्त केलाय.

पण लांब पाय असल्यामुळे एकाटेरिनाला अनेक अडचणींना सामोरंही जावं लागलंय. शाळेत असताना आपल्या उंचीमुळे अनेकांनी तिची खिल्ली उडवली होती.

Loading...
Loading...

माॅडेलिंग व्यतिरिक्त एकाटेरिना खेळातही सहभाग घेतला होता. 2008 मध्ये तिने रशियन आॅलिम्पिक बाॅस्केटबाॅल टीमकडून खेळली होती. बिजिंगमध्ये झालेल्या आॅलिम्पिकमध्ये तिने कास्यपदकही पटकावले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 13, 2017 09:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close