S M L

मलेशियात 'जीएसटी' रद्द होणार - पंतप्रधान महाथीर यांची घोषणा

मलेशियातला जीएसटी (GST) हा कर रद्द होणार असल्याची घोषणा नवनिर्वाचित पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी केलीय. त्या जागेवर आता पूर्वीचाच एसएसटी लागू होणार आहे.

Ajay Kautikwar | Updated On: May 12, 2018 06:24 PM IST

मलेशियात 'जीएसटी' रद्द होणार - पंतप्रधान महाथीर यांची घोषणा

कॉलालंपूर,ता.12 मे: मलेशियातला जीएसटी (GST) हा कर रद्द होणार असल्याची घोषणा नवनिर्वाचित पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी केलीय. 92 वर्षांचे मोहम्मद यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. मलेशियात आता पूर्वीचा सेल्स अँड सर्व्हिस टॅक्स (SST) लागू होणार आहे.

राजधानी कॉलालंपूर इथं पत्रकार परिषद घेऊन महाथीर यांनी ही घोषणा केली. जीएसटीमुळं देशाचं जीवनमान महागलं होतं. अशी परिस्थिती देशात राहू शकत नाही असं ते म्हणाले. एसएसटी रद्द करून 1 एप्रिल 2015 ला मलेशियात 6 टक्के जीएसटी लागू करण्यात आला होता.

देशाचा व्यापार, चीनसोबतचे संबंध आणि सर्व घटकांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचं महाथीर यांनी स्पष्ट केलं. मलेशियात झालेल्या निवडणूकीत प्रचारादरम्यान महाथीर यांनी जीएसटी रद्द करण्याचे संकेत दिले होते.

जीएसटीमुळं देशात करात घट तर कर्जाचा बोजा वाढल्याची टीका करण्यात येत होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 12, 2018 06:23 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close