VIDEO : 'हाऊ डेयर यू'! 16 वर्षांच्या मुलीने बड्या नेत्यांना विचारला जाब

VIDEO : 'हाऊ डेयर यू'! 16 वर्षांच्या मुलीने बड्या नेत्यांना विचारला जाब

हवामान बदल आणि तापमानवाढीचा मुद्दा घेऊन जगभरात लढा देणाऱ्या या मुलीचा आवाज पुन्हा एकदा या परिषदेत दुमदुमला. तुम्ही युवापिढीला धोका दिला आहे, आम्ही तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असं तिने ठणकावलं.

  • Share this:

न्यूयॉर्क, 25 सप्टेंबर : संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेत 16 वर्षांच्या एका मुलीने बड्याबड्या नेत्यांना सवाल केले, कधी दटावलं, त्यांच्याकडे कधी रागावून पाहिलं तर कधी तिच्या डोळ्यांतून अश्रू झरले...

स्वीडनच्या ग्रेटा थनबर्गने पर्यावरण परिषदेत सगळ्यांची मनं जिंकून घेतली. या परिषदेत 60 देशांचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित होते पण त्यांच्यासमोर बोलताना ती डगमगली नाही.

ग्रेटा थनबर्गचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. हवामान बदल आणि तापमानवाढीचा मुद्दा घेऊन जगभरात लढा देणाऱ्या या मुलीचा आवाज पुन्हा एकदा या परिषदेत दुमदुमला.

तुम्ही युवापिढीला धोका दिला आहे, आम्ही तुम्हाला कधीही माफ करणार नाही. तापमानवाढ रोखण्यासाठी तुम्ही गंभीर नाही, असं तिने ठणकावलं.

ग्रीन हाऊस वायूंमुळे पृथ्वीचं तापमान वाढत चाललं आहे पण त्याचा सामना करण्यात तुम्ही सगळे अपयशी ठरला आहात, असंही ती म्हणाली.

ग्रेटाचा हा व्हिडिओ गेल्या 24 तासांत अनेकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावरही तो ट्रेंड होतोय. तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात तर खरंच थक्क व्हाल.

'हाऊ डेयर यू' असा प्रश्न विचारताना तिचा रोख अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्यावरही होता, असं म्हटलं जातंय. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी ग्रेटाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती पण या भेटीत उगाचच वेळ वाया जाईल, असं म्हणत ग्रेटाने त्यांना भेटायला नकार दिला.

ग्रेटा स्टॉकहोममधल्या एका शाळेत शिकत होती. जेव्हा ती उन्हाळ्याच्या सुटीनंतर शाळेत गेली तेव्हा तिच्या लक्षात आलं, शाळेपेक्षाही जास्त गरजेचं आहे पर्यावरण वाचवणं. पर्यावरणाचं रक्षण झालं नाही तर हे शिक्षण तरी काय कामाचं ? असं तिला वाटलं.

(हेही वाचा : PMC बँकेच्या कारवाईनंतर या 9 बँका बंद होणार का? RBI ने केला खुलासा)

हा विचार मनात आल्यावर तिने शाळेतून ब्रेक घेतला आणि तिने क्लायमेट चेंजविरुद्धच्या लढाईत उडी घेतली. स्टॉकहोममधल्या स्वीडिश संसदेसमोर तिने बॅनर हातात घेऊन आंदोलन सुरू केलं. पर्यावरणासाठी तिने शाळेत संप केला ! शाळेतल्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी शाळा सोडायची आणि रस्त्यावर येऊन आंदोलन करायचं असं आवाहन तिने केलं.

तिच्या या आंदोलनाची दखल जगाला घ्यावी लागली. आता ग्रेटा जगभरात हवामान बदल आणि तापमानवाढ या विषयांबद्दल जागृतीसाठी फिरत असते. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेतही तिचा हाच आवाज बुलंद झाला.

========================================================================================

VIDEO : आजोबांसाठी नातूही मैदानात, भाजपवर जोरदार हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 07:59 PM IST

ताज्या बातम्या