OMG! या देशात 4 Days A Week होण्याची शक्यता; सुट्ट्यांचं नो टेन्शन, सरकारचा प्लान तयार

4 दिवसाच्या आठवड्याच्या (Four Days A Week) संकल्पनेत कोणते 4 दिवस काम करायचे हे निवडण्याचा अधिकार तेथील कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.

4 दिवसाच्या आठवड्याच्या (Four Days A Week) संकल्पनेत कोणते 4 दिवस काम करायचे हे निवडण्याचा अधिकार तेथील कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.

  • Share this:
    जपान, 25 जून : चांगली यंत्रणा आणि योग्य निर्णय अशी जपानची (Japan) ओळख आहे. कठोर परिश्रमांच्या जोरावर जपानने मोठी भरारी घेतली आहे. अनेक क्षेत्रात जपानची कामगिरी सर्वोत्तम मानली जाते. यात सातत्य राहावे यासाठी तेथील सरकार काही नवीन नियम लागू करण्याचा विचार करीत आहे. नुकतेच जपान सरकारने (Japan Government) कर्मचाऱ्यांना आठवड्यातील 5 ऐवजी 4 दिवस काम करण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, असे तेथील कंपन्यांना सूचित केले आहे. 4 दिवसाच्या आठवड्याच्या (Four Days A Week) संकल्पनेत कोणते 4 दिवस काम करायचे हे निवडण्याचा अधिकार तेथील कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. खरंतर, जपान सरकार नागरिकांना नोकरी, कौटुंबिक जबाबदारी आणि नवीन कौशल्ये शिकण्याची गरज याचे संतुलन ठेवण्यासाठी पुरेसा वेळ देऊ इच्छित आहे. यामाध्यमातून त्यांचे आयुष्य चांगले व्हावे, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. जपान सरकारने यासाठी गाइड लाईनदेखील (Guideline) तयार केली आहे. मात्र या गाइडलाईनच्या अनुषंगाने देशभरात वादविवाद सुरु झाले आहेत. हे ही वाचा-इस्त्रायल मास्कमुक्तीकडून पुन्हा मास्कसक्तीकडे, पसरतेय डेल्टा व्हायरसची दहशत अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा 4 दिवसांचा आठवडा केल्यास लोकांना अतिरिक्त सुट्या (Extra Leaves) मिळतील. यामुळे नागरिक घराबाहेर पडतील, खर्च करतील आणि याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळेल, अशी जपान सरकारला आशा आहे. घटत्या जन्मदराची समस्या सुटेल सुट्या मिळाल्यावर कपल्स बाहेर फिरायला जातील. एकमेकांना भेटतील. त्यांचा विवाह होऊन मूल जन्माला घालतील. यामुळे जपानमधील घटत्या जन्मदराची (Birthrate) समस्या सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हे ही वाचा-किम जोंगची सटकली, मोबाईल वापरला म्हणून 10 जणांना जाहीर मृत्युदंडाची शिक्षा 'कारोशी'वर ठरेल परिणामकारक जास्त प्रमाणात काम केल्याने लोक आजारी पडल्याचे किंवा अतितणावामुळे कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना जपानमधून कायमच ऐकायला मिळतात. याला जपानी भाषेमध्ये कारोशी म्हणतात. याचा अर्थ आहे अतिकामामुळे होणारा मृत्यू. 4 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय झाल्यास या घटनांचे प्रमाण कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. कंपन्यांना या सूचना आवडत आहेत रिसर्च फर्म फूजित्सूचे अर्थतज्ज्ञ मार्टिन शूल्त्स यांनी सांगितले की या बदलाबाबत सरकार गांभिर्याने विचार करत आहे. महामारीच्या (Pandemic) कालावधीत कंपन्यांनी कामकाजाच्या अनुषंगाने नवनवीन पद्धतीचा अवलंब केला आहे. जपानमधील काही कंपन्यांनी सरकारच्या या योजनेची अंमलबजावणी सुरु केली असून आता त्यांची जागाही कमी होत आहे. उत्पन्न घटण्याची शक्यता काही अर्थतत्ज्ञांच्या मते, या योजनेत अनेक त्रुटी आहेत. कामगारांच्या कमतरतेला जपान तोंड देत आहे. त्यातच कमी दिवस काम केल्यास उत्पन्नात (Income) देखील घट होण्याची चिंता या कामगारांना सतावत आहे.
    First published: