Home /News /videsh /

'आम्हाला कुटुंबीयांकडून धोका'; दोघा बहिणींकडून थेट सरकारची फसवणूक, वाचा काय आहे प्रकरण

'आम्हाला कुटुंबीयांकडून धोका'; दोघा बहिणींकडून थेट सरकारची फसवणूक, वाचा काय आहे प्रकरण

दोन बहिणी सरकारी सुविधा मिळवण्यासाठी फक्त खोटंच बोलल्या नाहीत तर त्यांनी अनेक वर्ष सरकारी घरही बळकवलं. ज्या लोकांकडे राहाण्यासाठी घर नाही किंवा घरातील लोकांकडून ज्या व्यक्तींना त्रास दिला जात आहे, अशांना ब्रिटिश काउन्सिलतर्फे राहाण्यासाठी घर दिलं जातं.

पुढे वाचा ...
    लंडन 06 जून : दोन बहिणी सरकारी सुविधा मिळवण्यासाठी फक्त खोटंच बोलल्या नाहीत तर त्यांनी अनेक वर्ष सरकारी घरही बळकवलं. हे प्रकरण आहे यूनायटेड किंगडममधील (United Kingdom). ज्या लोकांकडे राहाण्यासाठी घर नाही किंवा घरातील लोकांकडून ज्या व्यक्तींना त्रास दिला जात आहे, अशांना ब्रिटिश काउंसिलतर्फे राहाण्यासाठी घर दिलं जातं. या घटनेतील दोघा बहिणींची नावं हन्नाह रफीक आणि आयशा रफीक अशी आहेत. दोघीही लीड्समध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहातात. 2013 मध्ये त्यांनी ब्रिटिश काउन्सिलकडे अशी तक्रार केली होती, की त्यांच्या आईनं त्यांना घराबाहेर काढलं आहे. आम्ही दोघी आता बेघर झालो आहोत. इतकंच नाही, तर आम्हाला भीती आहे, की कुटुंबातील सदस्य आमची हत्या करतील. डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या या तक्रारीनंतर ब्रिटिश काउन्सिलनं त्यांनी 3 बीएचके घर दिलं. मात्र, आता त्यांनी चिठ्ठी लिहित ब्रिटिश काउन्सिलसोबतच सामान्य जनतेचीही माफी मागितली आहे. कारण, जे घर त्यांना राहाण्यासाठी देण्यात आलं, ते एखाद्या खरंच गरज असणाऱ्या पीडिताच्या कामी आलं असतं. कोव्हॅक्सिन घेतलेल्यांना पुन्हा घ्यावी लागणार लस, प्रभावाबाबत अमेरिकेला शंका? तपासात असं समोर आलं, की या दोघी बहिणी ब्रिटिश काउन्सिलकडून मिळालेल्या घरामध्ये कधी गेल्याच नाहीत. त्या त्यांच्या आईसोबत आपल्याच घरी राहात होत्या आणि अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत कोणतीही चुकीची घटना घडलेली नाही. ही बाब समोर येताच सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला. लोकांचं असं म्हणणं आहे, की या दोघींमुळे खरंच पीडित असणाऱ्या लोकांनी मदत मिळू शकली नाही आणि खोटं बोलून या दोघींनी अनेक वर्ष सरकारी संपत्ती हडपली आणि याचा काहीही उपयोगही त्यांनी केला नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Financial fraud

    पुढील बातम्या