मॉस्को, 11 डिसेंबर : आपण सगळेचा आता गूगल मॅप्सला (Google Maps) सरावलो आहोत. माहिती नसलेल्या ठिकाणी जाताना पत्ता शोधायला जगभरात या यंत्रणेचा वापर केला जातो. गूगल मॅप्स बहुतांशवेळा त्याची बुद्धी (Artificial Intelligence) चालवून आपल्याला जवळचा, कमी रहदारीचा रस्ता किंवा शॉर्ट कट सुटवतं. पण हाच शॉट कट तुमच्या आयुष्यातील ‘आखरी रास्ता’ ठरला तर? भीती वाटली ना?
रशियातील सायबेरियात असाच काहीसा प्रकार घडला आहे. द सन या वृत्तपत्रातील बातमीनुसार दोन तरुण मुलांना गूगल मॅप्सने दाखवलेल्या शॉर्ट कटमुळे (Short Cut) ते थेट सर्वांत थंड प्रदेशात पोहोचले आणि तापमान उणे 50 डिग्रीपर्यंत पोहोचल्यामुळे त्यांची तिथून सुटका होऊ शकली नाही. त्यात एका 17 वर्षांच्या मुलाचा थंडीने गोठून मृत्यू झाला तर त्याच्या मित्र गंभीर आजारी असून हॉस्पिटलमध्ये मृत्युशी झुंज देत आहे.
सर्बियातील सर्गे उस्तीनोव्ह आणि वाल्दीस्लाव इस्तोमिन हे दोन मित्र फिरायला म्हणून कारने जगातील सर्वांत थंड हवामानाचं शहर याकुत्सकजवळ (Yakutsk) असलेल्या पोर्ट ऑफ मागादानला (Port of Magadan) निघाले होते.
हे वाचा - Google वर तयार करा आपलं व्हर्च्युअल कार्ड; फेक प्रोफाइल्सना बसेल आळा
कोलिमा फेडरल हायवेवरून या ठिकाणी जायचं अंतर 1900 किमी आहे तर रोड ऑफ बोन्समार्गे (Road of bones) गेलं तर ते अंतर 1733 किलोमीटर पडतं. गुगल मॅप्सने हे गणित करून शॉर्ट कट म्हणून रोड ऑफ बोन्समार्गे जाण्याचा मार्ग या दोघांना सुचवला. त्यानुसार हे दोघं शॉर्ट कट मारण्याच्या नादात रोड ऑफ बोन्समार्गे निघाले. हा रस्ता निर्जन असून 1970 नंतर फारसा वापरला गेलेला नाही. त्या भागात अतिप्रचंड थंड हवामान असतं आणि इतरही कारणं आहेत.
गाडी पडली बंद
या दोघांची गाडी या रस्त्यावर आल्यानंतर अचानक तापमान उणे 50 डिग्रीवर आल्याने थंडीपासून कसा बचाव करायचा हे त्यांना समजलंच नाही. गाडीचा रेडिएटर बंद पडला त्यामुळे काहीच करणं शक्य नव्हतं. रस्त्यांवर बर्फाची चादर पसरली होती. त्यामुळे थंडीने गोठून सर्गेचा गाडीतच मृत्यू झाला आणि वाल्दीस्लावचे हातपाय गोठून गेले. त्याचे हातपाय कापावे लागले. तो जिवंत असून हॉस्पिटलमध्ये मृत्युशी झुंजतो आहे. सर्गेचा हायपरथर्मियामुळे मृत्यू झाला. त्याचा मृतदेह गोठलेल्या स्वरूपात मिळाल्याचं बातमीत म्हटलं आहे.
मृत्यूचा मार्ग
रोड ऑफ बोन्सला मृत्युचा मार्ग म्हणूनही ओळखतात. कारण इथे अनेकांचं मृत्यु झाले आहेत. हा भाग निर्जन आहे. स्टॅलनिनने राजकीय कैद्यांच्या मदतीने या भागात हा रस्ता तयार करून घेतला होता तो तयार करतानाच 10 लाख लोकांचा मृत्यु झाला होता. त्यामुळे 1970 पासून हा रस्ता कुणी वापरत नाही. त्यामुळेच गस्तीवर असलेल्या पोलिसांना या मुलांपर्यंत पोहोचायलाही उशीर झाला.
हे वाचा - धडधडू लागलं हृदय, सुरू झाला श्वासोच्छवास; मृतदेहाजवळ पोहोचताच नातेवाईकांना फुटला
गूगल मॅप्सने शॉर्ट कट म्हणून दाखवलेला रस्ता या मुलांच्या जीवावर बेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.