तरुणींची खरेदी-विक्री, अपहरणासोबत ISISच्या दहशतवाद्यांचा नवा धंदा, भारतही लिस्टमध्ये!

तरुणींची खरेदी-विक्री, अपहरणासोबत ISISच्या दहशतवाद्यांचा नवा धंदा, भारतही लिस्टमध्ये!

बुर्किना फासो हा खरंतर लहान शेतकऱ्यांचा देश आहे. पण आता तो अतिरेक्यांचा गड बनला आहे.

  • Share this:

बुर्किना फासो, 25 नोव्हेंबर : आफ्रिके(Africa)च्या पश्चिमेस स्थित बुर्किना फासो(Burkina Faso) आजकाल आयसिस (Islamic State of Iraq and Syria)चा बालेकिल्ला होत आहे. घनदाट जंगलांच्या मधोमध वसलेला हा परिसर दहशतवाद्यांना लपण्यासाठी अगदी योग्य आहे. पण हे प्रकरण येथेच संपत नाही, दहशतवादी या भागात फक्त लपून बसत नाहीत तर इथल्या संरक्षित वनक्षेत्रात दडलेलं सोने खोदून ते दहशतवादी कारवायांमध्येही(terror activities) वापरत आहेत.

इस्लामिक स्टेट आणि अल कायदा आता आफ्रिकेतील गरीब प्रदेश बुर्किना फासो येथे पोहोचले आहेत अशा पद्धतीची चेतावणी संयुक्त राष्ट्र (United Nations)आणि अनेक खाजगी संशोधकांकडून देण्यात आली आहे.  येथे जंगले आणि सोन्याच्या खाणी देखील आहेत. इस्लामी दहशतवादी लोकांसाठी ही मोठी संधी आहे. मोठ-मोठ्या खाणीतून ते सोनं काढून विकत आहेत. इस्लामी दहशत आणखी वाढवण्यासाठी त्यांना याचा फायदा होईल.

बुर्किना फासो हा खरंतर लहान शेतकऱ्यांचा देश आहे. पण आता तो अतिरेक्यांचा गड बनला आहे. 2018मध्ये उपग्रहांच्या मदतीने या गावाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ज्यामध्ये 2200 अशा खाणी समोर आल्या ज्याविषयी कोणालाच माहिती नव्हती. याचबरोबर इथे सोन्याच्या शेकडो खाणी आहेत. सोन्याच्या खाणींमुळे या भागाला तस्कऱ्यांनी लक्ष्य केलं. सोन्याच्या खाणींच्या शोधात जंगलं वेगाने तोडली जात आहेत, ज्यामुळे वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात आहे. त्यानंतर स्थानिक प्रशासन आणि सरकारने बुर्किना फासोच्या बर्‍याच भागांना संरक्षित वनक्षेत्र म्हणून घोषित केले.

2018 मध्ये, सहारा वाळवंटच्या दक्षिणेकडील भागात काही हालचाली सुरू झाल्या. तिथे मुस्लिम दहशतवादी घुसले होते. मोठ्या शस्त्र साठ्यासह आलेल्या हत्यारांनी जंगलांचे रक्षण करण्यासाठी तैनात केलेले सैन्य आणि वन कर्मचाऱ्यांना तेथून पळवून लावले. यानंतर स्थानिक शेतकऱ्यांना बोलवून त्यांना खाणी खोदण्यास सांगितलं.

मोठी बातमी - कोण होणार विधानसभा हंगामी अध्यक्ष? राज्यपालांकडे पाठवली 6 दिग्गज नेत्यांची नावं

ISIS ही जगातील सर्वात श्रीमंत दहशतवादी संघटना मानली जाते. ज्याचे बजेट 2 अब्ज डॉलर्स आहे. 2013 साली तयार झालेल्या या संघटनेला अल कायदाचा पाठिंबा मिळाला, जी स्वतः एक इस्लामिक अतिरेकी संघटना आहे. नंतर वेगवेगळ्या विचारसरणीमुळे हे दोघेही वेगळे झाले. सुमारे 10,000 सभासदांची सक्रिय सदस्यता असलेली ही संस्था निर्दयतेसाठी ओळखली जाते.

आयएसआयएसला तेल खाणी पकडणं, अपहरण करणं, खंडणी मागणं, मुलींची तस्करी करणं, अंमली पदार्थांचा व्यापार करणं आणि दहशतवादी कारवाया करणं अशा बेकायदेशीर कामातून पैसे मिळतात. मध्यपूर्वेत अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर त्याचे पाय उखडले गेले, त्यानंतर या संघटनेने आपले पाय इतरत्र पसरवायला सुरुवात केली.

असे मानले जाते की, बुर्किना फासो व्यतिरिक्त, इस्लामिक स्टेट माली आणि नायजरमध्ये सोन्याच्या खाणी हस्तगत करत आहेत. ज्यासाठी 2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च येऊ शकेल. हे सोनं विकून ते शस्त्रं विकत घेतात. नवीन सदस्यांना कामावर घेऊन ते ड्रग्जचा व्यवसाय वाढवत आहेत. बुर्किना फासोचे खनन मंत्री ओउमारु इदानी यांनी स्वतः कबूल केले की, इस्लामिक अतिरेक्यांनी संरक्षित भागात काही खाणी हस्तगत केल्या आहेत आणि लोकांना स्वतःच्या फायद्यासाठी खोदण्यासाठी उद्युक्त करत आहेत.

खाणीतून काढण्यात आलेलं सोनं हे मजुरांना दिलं जात नाही. तर ISISच्या ताब्यात घेतलं जातं. त्यानंतर हे सोनं शेजारील देश Togo ला पाठवलं जातं. हे शहर सोनं तस्करीसाठी ओळखलं जातं. टोगो शहरातून हे सोनं UAE (संयुक्त अरब अमीराती)पाठवलं जातं. जिथे सोन्याला रिफायनरीमध्ये वितळवून सौदी, तुर्की आणि स्वित्झर्लंडला पाठवलं जातं. इतकंच नाही तर हे सोनं भारतातही पाठवलं जातं. असं मानलं जातं की, संयुक्त अरब अमीराती हे ISISचे समर्थक आहेत. संयुक्त राष्ट्रा (United Nations) नुसार, फक्त 2018मध्ये UAE ने तब्बल 7 टन सोनं विकत घेऊन ते दुसऱ्या देशात विकलं होतं.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 25, 2019, 7:13 PM IST

ताज्या बातम्या