S M L

रशियात पडलेला सोन्याचा पाऊस पाहिलात का?

रशियात एका विमानाचा दरवाजा उघडा राहिल्याने विमानातून थेट धावपट्टीवरच तीन हजार किलो सोन्याचा पाऊस पडला.

Sonali Deshpande | Updated On: Mar 16, 2018 01:42 PM IST

रशियात पडलेला सोन्याचा पाऊस पाहिलात का?

16 मार्च : आजपर्यंत पैशांचा पाऊस पडल्याचं तुम्ही ऐकलं असेलच पण कधी सोन्याचा पाऊस पडलेला पाहिलं किंवा ऐकलं आहे का? हे ऐकायला जरी वेगळे वाटत असलं तरी प्रत्यक्षात रशियात असं घडलंय खरं. रशियात एका विमानाचा दरवाजा उघडा राहिल्याने विमानातून थेट धावपट्टीवरच तीन हजार किलो सोन्याचा पाऊस पडला. पावसात धावपट्टीवर हिऱ्यांसह अनेक मौल्यवान वस्तूही पडल्या. त्यामुळे विमानतळावरील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली.

रशियाच्या याकुस्क विमानतळावर धावपट्टीवरून उड्डाण घेत असताना एका विमानाचा दरवाजा उघडा राहिला. त्यामुळे विमानातील तीन हजार किलो सोने, हिरे आणि इतर धातूंची धावपट्टीवर बरसात झाली. या घटनेची माहिती मिळताच विमानतळापासून १२ किलोमीटर अंतरावरील एका गावात विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2018 01:39 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close