Home /News /videsh /

अरे देवा! कोरोनाचा असाही फटका, लॉक डाऊनमुळे जगभरात कंडोमचा तुटवडा

अरे देवा! कोरोनाचा असाही फटका, लॉक डाऊनमुळे जगभरात कंडोमचा तुटवडा

लॉक डाऊनमुळे कंडोम कंपनीला झाला 100 कोटींचा फायदा, पण आता झाला तुटवडा.

  क्वालालंपूर, 28 मार्च : कोरोनामुळं जगभरातील उद्योग ठप्प झाले आहे. 180 देशांमध्ये जवळजवळ लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळं सर्व उद्योगधंद्यांना मोठा फटका बसला आहे. मात्र लॉक डाऊनमुळे कंडोम कंपनीला फायदा आणि तोटा दोन्ही झाला आहे. गेल्या महिन्याभरात कंडोमची विक्रमी विक्री झाली आहे. त्यामुळं आता कंडोमची कमतरता जाणवत आहे. तसेच, कोरोनामुळं सर्व कंपन्या बंद करण्यात आल्य़ामुळं, येत्या काही काळात कंडोम बाजारात उपलब्ध असणार नाहीत. जगातली सर्वात जास्त कंडोम बनवणाऱ्या कंपनीला सर्वात मोठा फटका बसला आहे. एका आठवड्यापेक्षा जास्त कालावधीत या कंपनीने एकही कंडोम तयार केलेले नाही. त्यामुळं येत्या काळात तब्बल कंडोमच्या कमतरतेमुळे 748 कोटींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ड्युरॅक्स सारख्या ब्रँडना याचा सगळ्यात मोठा फटका बसला आहे. वाचा-भारतीय रेल्वेनंही सुरू केलं आयसोलेशन वॉर्ड, पाहा एक्स्प्रेसमधील INSIDE PHOTO
  केरेक्स बीएचडी या नामांकित कंडोम कंपनीचे मुख्य कार्यकारी गोह मिया किट यांनी, “कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळं निम्म्या क्षमतेनुसार मागणी कायम ठेवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. मात्र सर्वत्र कंडोमची जागतिक कमतरता ही भीतीदायक आहे", असे सांगितले. वाचा-...तर 29 एप्रिलला खरंच होणार जगाचा अंत? नासाने सांगितलं काय आहे सत्य केरेक्स बीएच ही मलेशियातील प्रसिद्ध कंपनी असून येथील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2 हजारहून अधिक आहे. तर 26 लोकांचा मृत्य़ू झाला आहे. मलेशियात सध्या 14 एप्रिलपर्यंत लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळं सध्या कंडोमची निर्मिती बंद करण्यात आली आहे. चीनही कंडोम तयार करणारा एक प्रमुख देश आहे, मात्र कोरोनामुळे येथील कारखानेही बंद झाले आहेत. वाचा-तलफ भागवण्यासाठी टपरी फोडली, पण मालकाच्या हुशारीमुळे संतापले चोरटे, पाहा हा VIDEO
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Corona

  पुढील बातम्या