मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

कोट्यवधींचं हॉटेल उभारताना झाली एक चूक, हजारो नागरिकांना बसतोय फटका

कोट्यवधींचं हॉटेल उभारताना झाली एक चूक, हजारो नागरिकांना बसतोय फटका

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या एका हॉटेलमध्ये अशी (Glasses of giant hotel making trouble for citizens while driving) काही चूक झाली की त्या परिसरातील हजारो नागरिकांना त्याचा त्रास होऊ लागला.

  • Published by:  desk news

लंडन, 30 नोव्हेंबर: कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या एका हॉटेलमध्ये अशी (Glasses of giant hotel making trouble for citizens while driving) काही चूक झाली की त्या परिसरातील हजारो नागरिकांना त्याचा त्रास होऊ लागला. एखादं अलिशान हॉटेल उभारताना त्यावर कोट्यवधी (Hotels worth crore of rupees) रुपये तर खर्च होतच असतात, शिवाय प्रचंड मोठं मनुष्यबळही त्यासाठी काम करत असतं. कुठलीही इमारत उभारण्यापूर्वी त्याचा प्लॅन तयार करण्यात येतो. त्याच्या बारीकसारीक गोष्टींचा विचार केला जातो आणि पूर्ण नियोजन करूनच इमारत उभारण्यात येते. मात्र ब्रिटनमध्ये (Mistake while building hotel) नव्याने उभ्या राहिलेल्या एका हॉटेलच्या बांधकामात अशी चूक झाली आहे, ज्याचा शहरातील हजारो नागरिकांना फटका बसतो आहे.

काय आहे चूक?

ब्रिटनमधील मिल्टन कीन्स शहरात ला टूर नावाचं हॉटेल उभारण्यात आलं आहे. हे हॉटेल उभं करताना त्याला बाहेरच्या बाजूला ज्या काचा लावण्यात आल्या आहेत, त्यातून सूर्याचे किरण परावर्तीत होऊन नागरिकांना त्रास होत आहे. या अवाढव्य इमारतीवरून सूर्याचे किरण परावर्तीत होत असल्यामुळे रस्त्याने येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांचं डोळे दिपत असून मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सूर्यापेक्षाही अधिक त्रास

सूर्यापेक्षाही या इमारतीवरून येणारी किरणं ही प्रखऱ आणि थेट डोळ्यात जाणारी असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. वाहन चालवताना अचानक या इमारतीवरून येणारी किरणं डोळ्यात जातात आणि अक्षरशः डोळ्यांसमोर अंधारी येत असल्याचे अनुभव नागरिकांनी व्यक्त केले आहेत. इमारत बांधताना या गोष्टीचा विचार इंजिनिअरने कसा काय केला नाही, याबाबत नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हे वाचा- निष्पाप मुलाने पाहिला 5 मिनिटांचा सिनेमा, मिळाली 14 वर्षांची शिक्षा

हॉटेल बदलणार स्वरूप

ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी हॉटेलनं समस्येवर तोडगा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे. काचा बदलून किंवा काचांसमोर आणखी एखादा घटक लावून त्यातून किरण परावर्तीत होणार नाहीत, याची काळजी घेण्यात येईल, असं हॉटेल प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: Britain, London