Home /News /videsh /

हे काय भलतच! चीनमध्ये Rent वर मिळते गर्लफ्रेंड; आई-बाबांना दाखवायलाही घेऊन जातात तरुण

हे काय भलतच! चीनमध्ये Rent वर मिळते गर्लफ्रेंड; आई-बाबांना दाखवायलाही घेऊन जातात तरुण

मात्र रेन्टवर गर्लफ्रेंड ठेवण्याच्या काही अटी असतात. हायर केलेल्या तरुणीला तुम्ही स्पर्श करू शकत नाही.

    चीन, 25 सप्टेंबर : अधिकतर चिनी तरुण (China News) सुट्टी घालविण्यासाठी आपल्या घरी जातात, तेव्हा रेन्टवर गर्लफ्रेंड हायर (Girlfriend On Rent) करतात. अन्यथा त्यांना आई-वडील आणि नातेवाईकांच्या अवघड प्रश्नांचा सामना करावा लागतो. अनेकदा गर्लफ्रेंड आणि लग्न यासारख्या विषयांवर मोठ्या मंडळींकडून ऐकून घ्यावं लागतं. अशा वेळेत चिनी तरुण गर्लफ्रेंड रेन्टवर घेतात. ज्यामुळे त्यांना आई-वडिलांची बोलणी ऐकावी लागत नाहीत. मात्र रेन्टवर गर्लफ्रेंड ठेवण्याच्या काही अटी असतात. हायर केलेल्या तरुणीला तुम्ही स्पर्श करू शकत नाही. मुलगी त्या तरुणाला भावनिक आधार देते, आणि त्याच्या गर्लफ्रेंड प्रमाणे वागते. मात्र शारिरीक जवळीक करण्यास परवानगी नसते. (girlfriends on rent in china ) मिळालेल्या माहितीनुसार, रेन्टवर गर्लफ्रेंड हायर केल्यानंतर मुलांना 1,999 युआन म्हणजे तब्बल 22,816 रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. त्यानंतरत ते रेन्टवर घेतलेल्या गर्लफ्रेंडला आपल्या आई-वडिलांची भेट घालून देऊ शकतात. तिच्यासोबत डेटवर जाऊ शकतात. तिच्यासह गप्पा ही मारू शकतात. हे ही वाचा-चिनी कंपनीचं संतापजनक कृत्य; चिमुकल्यांच्या कपड्यांवर छापले भारतविरोधी मेसेज मात्र न्यू इअरच्या वेळी चीनमध्ये रेन्टवर गर्लफ्रेंड घेणं महाग पडत. तेव्हा तरुण रेन्टवर गर्लफ्रेंड घेण्यासाठी 3 हजार युआन म्हणजे 34,241 रुपयांपासून 10 हजार युआन म्हणजे 1,14,139 रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. कारण नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान (expensive to get a girlfriend on rent in the new year) अधिकतर लोक सुट्टीवर घरी येतात. रेन्टवर काम करणाऱ्या एका तरुणीने सांगितलं की, तिचं काम खूप कठीण असतं. कारण तिला प्रत्येक वेळी एका अनोळखी तरुणाची गर्लफ्रेंड व्हावं लागतं. चीनमधील असे अनेक विचित्र वाटावे अशा गोष्टी पाहायला मिळतात. त्यात भारत आणि चीन दरम्यान असलेले संबंध हा कायमच ज्वलंत विषय राहिला आहे. काही दिवसांपूर्वीच चीनमधील प्रसिद्ध क्लॉदिंग ब्रँड JNBY (Chinese clothing brand JNBY) ने लहान मुलांच्या कपड्यांवर भारतविरोधी मेसेज (Anti india massage on chinese clothing brand) छापले होते.  एका आईने सोशल मीडियावर याबाबत तक्रार केली आणि या ब्रांडवर बहिष्कार घालण्याची मागणी केली होती.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Boyfriend, China, Girlfriend

    पुढील बातम्या