• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • पुरावा देणाऱ्याला होतं तब्बल 2 कोटींचं बक्षीस, आरोपीच्या गर्लफ्रेंडनंच उचललं हे पाऊल अन् मग...

पुरावा देणाऱ्याला होतं तब्बल 2 कोटींचं बक्षीस, आरोपीच्या गर्लफ्रेंडनंच उचललं हे पाऊल अन् मग...

पामेला पेरीने शुक्रवारी कोर्टात केस दाखल केली आणि म्हटलं की, अँटोनी वॉर्नरला हल्लेखोर म्हणून सिद्ध करण्यासाठी मोठा धोका पत्करून कायदेशीर संस्थांना मदत करण्यासाठी ती पुढे आली.

 • Share this:
  वॉशिंग्टन 21 नोव्हेंबर : अमेरिकेतील (US) नॅशविले येथे गेल्या वर्षी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला स्फोट (2020 Nashville Bombing) घडवून आणलेल्या व्यक्तीच्या माजी प्रेयसीने न्यायालयात दावा दाखल केला आहे. तिनं म्हटलंय की हल्लेखोराची माहिती देणाऱ्यासाठी आधीच बक्षिसाची रक्कम जाहीर करण्यात आली होती. मात्र, ही रक्कम तिला माहिती देऊनही मिळालेली नाही. त्यामुळे जाहीर केलेली बक्षिसाची रक्कम म्हणजेच सुमारे तीन लाख डॉलर्स लवकरात लवकर द्यावेत, अशी विनंती तिनं केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पामेला पेरीने शुक्रवारी डेव्हिडसन काउंटी चॅन्सरी कोर्टात केस दाखल केली आणि म्हटलं की, अँटोनी वॉर्नरला हल्लेखोर म्हणून सिद्ध करण्यासाठी मोठा धोका पत्करून कायदेशीर संस्थांना मदत करण्यासाठी ती पुढे आली. एबीसी न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आरोपी हल्लेखोर वॉर्नरने 25 डिसेंबर रोजी नॅशविलमध्ये आत्मघाती हल्ला केला. ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले आणि अनेक इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. स्फोटानंतर, कॅम्पिंग वर्ल्डचे सीईओ मार्कस लेमोनिस यांनी हल्लेखोराबद्दल माहिती देणाऱ्याला $250,000 आणि नॅशविल (Nashville) कन्व्हेन्शन अँड व्हिजिटर्स कॉर्पने $34,500 चे बक्षीस जाहीर केले होते. आरोपी पकडला न गेल्याने पोलिसांनी या महिलेचे नाव बक्षीसासाठी पुढे केले नाही. मार्कस लेमोनिसच्या प्रवक्त्याने डब्ल्यूटीव्हीएफ टीव्हीला सांगितले की, हल्लेखोराची माहिती देणाऱ्यासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. जेणेकरून माहितीवरुन त्याला पकडण्यात मदत होईल. या प्रकरणाचा तपास अनेक यंत्रणांनी आपापल्या स्तरावर केला असला, तरी आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला नाही. मात्र आरोपीबद्दल माहिती देणाऱ्या महिलेला बक्षीस देण्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. या हल्ल्यातील आरोपी वार्नरचा स्फोटातच मृत्यू झाला होता. त्यामुळे तो कधीच पकडला गेला नाही. यानंतर जेव्हा बक्षीस मिळालं नाही तेव्हा महिलेनं कोर्टाचा दरवाजा ठोठावला. तिने दोन कोटी रुपये मिळवून देण्याची मागणी केली आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: