Home /News /videsh /

प्रेम आंधळं असतं पण इतकं? BF ला घटस्फोट मिळेना म्हणून GF ने त्याच्या बायकोसह...

प्रेम आंधळं असतं पण इतकं? BF ला घटस्फोट मिळेना म्हणून GF ने त्याच्या बायकोसह...

बॉयफ्रेंडला बायको त्याला घटस्फोट देईना म्हणून गर्लफ्रेंडने केलं खतरनाक कृत्य.

    लंडन, 24 डिसेंबर : प्रेम आंधळं असतं, असं म्हणतात. प्रेमात वेडं झालेल्याला दुसरं काहीच दिसत नाही. प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असते. अशाच एका महिलेचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. तिने प्रेमात खतरनाक असं कृत्य केलं आहे. बॉयफ्रेंडची बायको त्याला घटस्फोट देईना म्हणून गर्लफ्रेंडने नको ते पाऊल उचललं आहे. यूकेतील नॉर्थ शील्ड्समध्ये राहणारी 23 वर्षांची क्लो शोटन. तिने आपल्या बॉयफ्रेंडची बायको लीन स्टिलडॉल्फच्या घराला आग लावली आहे. कारण ती घटस्फोट पेपरवर सही करत नव्हती. द सनच्या रिपोर्टनुसार ही घटना 31 जुलैची आहे. नॉर्थ शील्ड्समध्ये राहणारी लीन स्टिलडॉल्फ आपल्या 17 वर्षांच्या मुलासोबत घरात होती. त्यावेळी तिच्या घरी तिची मैत्रीण आणि तिची मुलगीही आली होती. हे वाचा - मित्रांचा प्रताप अन् नवरदेवाला नवरीसमोर झुकवावी लागली मान; काय घडलं पाहा VIDEO लीनला पहाटे पाचच्या सुमारास फायर अलार्मचा आवाज ऐकू आला. ती आपल्या खोलीतून बाहेर आली. तेव्हा घरात सर्वत्र धूरच धूर होता. जळल्याचा वासही येत होता. तिने लगेच अग्निशमन दलाला फोन केला. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झालं आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं. लीनने सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हा तिला धक्काच बसला. शोटनने लाइटरने एक कागद पेटवला आणि तो तिच्या घरात फेकताना ती दिसली. लीनने याबाबत पोलिसांना सांगितलं. पोलीस तपासात शोटननेच आग लावल्याचं सिद्ध झालं आणि तिला लगेच अटक करण्यात आली. लीनने सांगितलं, शोटन तिच्या नवऱ्याची गर्लफ्रेंड आहे. 2019 पासून ती त्रास देते आहे.  नवऱ्याला घटस्फोट द्यायला मी उशीर करत होते म्हणून तिला राग यायचा. अजून तिला घटस्फोट पेपरवर सही करायचे नव्हते. हे वाचा - अजब हट्ट! पुरामुळे खराब झाला लग्नाचा अल्बम, आता फोटोसाठी करायचंय दुसरं लग्न न्यूकॅस क्राऊन कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली. तिला साडेतीन वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Couple, Fire, Relationship, Wife and husband, World news

    पुढील बातम्या