Home /News /videsh /

बापरे! नदीत पोहताना तरुणीवर आलं भलंमोठं संकट, मित्राने असा केला बचाव

बापरे! नदीत पोहताना तरुणीवर आलं भलंमोठं संकट, मित्राने असा केला बचाव

ती पोहायला पाण्यात उतरली खरी, मात्र थोड्याच वेळात आपल्यावर जीवघेणं संकट येणार आहे, याची तिला कल्पनाही नव्हती. काही क्षण गेले आणि अचानक...

    जांबिया, 5 डिसेंबर: नदीत पोहायला गेलेल्या तरुणीवर अचानक असं एक संकट ओढवलं की तिच्या जीवनमरणाचा प्रश्नच उभा राहिला. हे संकट होतं मगरीनं केलेल्या हल्ल्याचं. परदेशातून आलेल्या या तरुणीला पाण्यात मगर आहे, याची कल्पनाही देण्यात आली नव्हती. अचानक झालेल्या हल्ल्यातून तिला तिच्या मित्रानं बचावलं खऱं, मात्र तरुणी गंभीररित्या जखमी झाली आहे. धाडसी खेळांची आवड असणारी ही तरुणी मगरीची शिकार ठरली. असा झाला हल्ला 18 वर्षांची ब्रिटीश तरूणी एमिली ऑस्बॉर्न स्मिथ ही सुट्टीसाठी जांबियाला गेली होती. मित्रांसोबत ऍडव्हेंचर स्पोर्ट्स करण्याचा तिचा इरादा होता. तिच्यासोबत असणाऱ्या टूर गाईडसोबत ती वॉटर रिफ्टिंग करत होती. नदीत एका ठिकाणी बोट आल्यावर हे पाणी पोहण्यासाठी उत्तम असल्याचं टूर गाईडनं सांगितलं. त्यावर पोहण्याची आवड असणाऱ्या एमिलीनं पाण्यात उडी मारली आणि डुंबायला सुरुवात केली. मगरीने केला हल्ला या पाण्यात मगरीदेखील आहेत, याची कल्पना टूर गाईडने एमिलीला दिलीच नव्हती. त्यामुळे अगदी बिनधास्त आणि बेसावध असलेली एमिली पाण्यात डुंबत असताना अचानक एका मगरीनं तिच्यावर हल्ला चढवला. तिला पकडून ओढून नेण्याचा प्रयत्न मगर करू लागली. त्यावेळी तिच्या मित्राने पाण्यात उडी मारली आणि मगरीच्या चेहऱ्यावर बुक्क्या आणि लाथांनी प्रहार करायला सुरुवात केली. साधारणतः अशा प्रकारे मानवी लाथाबुक्क्यांचा मगरीला काहीच फरक नाही. मात्र एमिलीच्या मित्राने केलेला हल्ला पाहून मगर गांगरली आणि माघारी फिरली. यामुळे एमिलीचा जीव वाचला. हे वाचा- 4 पायांच्या प्राण्याप्रमाणे चालतात 'या' कुटुंबातील सदस्य, डॉक्टरही झाले हैराण तरुणी गंभीर जखमी या हल्ल्यातून एमिलीचा जीव वाचला असला तरी ती गंभीररित्या जखमी झाली आहे. तिच्या पायावर मगरीने हल्ला केला होता आणि तो जवळपास धडापासून वेगळा झाला होता. तिच्या खुब्याचं एक हाडदेखील धडापासून वेगळं झालं आहे. जखमी अवस्थेत एमिलीला हॉस्पिटलमध्ये दाखल कऱण्यात आलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crocodile, London, Sports, Water

    पुढील बातम्या