मराठी बातम्या /बातम्या /विदेश /चेहऱ्यावर ऍसिड फेकणाऱ्याशीच तिनं केलं लग्न, सोशल मीडियावर जोरदार टीका

चेहऱ्यावर ऍसिड फेकणाऱ्याशीच तिनं केलं लग्न, सोशल मीडियावर जोरदार टीका

ज्याने ऍसिड फेकलं, त्याच्याशीच तरुणीनं लग्न केलं. या विचित्र घटनेवरून सध्या उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

ज्याने ऍसिड फेकलं, त्याच्याशीच तरुणीनं लग्न केलं. या विचित्र घटनेवरून सध्या उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

ज्याने ऍसिड फेकलं, त्याच्याशीच तरुणीनं लग्न केलं. या विचित्र घटनेवरून सध्या उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

टर्की, 25 डिसेंबर: ज्या तरुणानं चेहऱ्यावर ऍसिड (Acid) फेकून आपलं आयुष्य (Spoiled life) बरबाद केलं, त्याच्याशीच तरुणीनं लग्न (Married him) केल्याची घटना समोर आली आहे. रागाच्या भरात तरुणाने तरुणीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं होतं. त्यात तिचा चेहरा तर विद्रुप झाला होताच, शिवाय तिची ऐकू येण्याची क्षमताही (Listening capacity) केवळ 30 टक्केच उरली होती. तू जर माझी झाली नाहीस, तर मी तुला इतर कुणाचीही होऊ देणार नाही, असं म्हणत तरुणाने तरुणीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं होतं.

अशी घडली घटना

टर्कीत राहणाऱ्या 20 वर्षांच्या बेरफिन ओजेक नावाच्या तरुणीचं कासीम ओजन सेल्टी नावाच्या तरुणासोबत अफेअर सुरू होतं. दोघंही रिलेशनशिपमध्ये होती आणि काळ हे नातेसंबंध टिकून होते. मात्र काही कारणांनी त्यांच्यातील संबंध बिघडायला सुरुवात झाली आणि बेरफिननं वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे संतापलेल्या कासीमने तिचा चेहरा विद्रुप करण्याचा निर्णय घेतला. माझी झाली नाहीस, तर कुणाचीही होऊ देणार नाही, असं म्हणत त्याने बेरफिनच्या चेहऱ्यावर ऍसिड हल्ला केला.

कासीमला अटक

या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी बेरफिननं मोठा लढा दिला. कासीमला न्यायालयात खेचलं आणि न्यायालयानं त्याला शिक्षाही सुनावली. 13 वर्षं आणि 6 महिन्यांची शिक्षा भोगण्यासाठी तो तुरुंगातही गेला. तरुणीवर ऍसिड फेकण्याची जबरी शिक्षा त्याला मिळाल्यानंतर त्याला अपराधाची जाणीव झाली आणि तो गयावया करू लागला. त्याने तरुणीची माफी मागायला सुरुवात केली, वारंवार तिला मेसेज करून पश्चात्ताप व्यक्त करू लागला.

तरुणीने केले माफ

तरुणीनं त्याला माफ करण्याचा निर्णय घेतला आणि आपली तक्रार मागे घेतली. टर्कीतील नव्या नियमांनुसार एखाद्या व्यक्तीनं तक्रार मागे घेतली, तर त्या तक्रारीसाठी झालेली शिक्षादेखील रद्द करण्यात येते. त्यानुसार कासीमची शिक्षा रद्द झाली. त्याने तुरुगांतून सुटल्यावर थेट बेरफिनचं घर गाठलं आणि तिला लग्नाची मागणी घातली.

हे वाचा - वाह..! दहशतवाद्यांविरोधात शोपियानमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई

दोघांनी केलं लग्न

दोघांनीही घरच्यांना कल्पना न देताच एकमेकांशी लग्न केलं आणि आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. बेरफिनच्या वडिलांना यामुळे फारच वाईट वाटलं. ज्याच्याविरुद्ध लढण्यासाठी आपण आयुष्य पणाला लावलं, त्या तरुणासोबतच मुलीनं लग्न केल्याचं वाईट वाटत असल्याचं ते म्हणाले. तर सोशल मीडियावरही यावरून बेरफिनवर टीका होत आहे. माफ केल्याने अपराधाचं गांभीर्य कमी होत नसल्याचा दावा युजर्सनी केला आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Marriage, Turkey