मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

भयंकर! जॉगिंगला गेलेल्या तरुणीचे भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके, वेदनेनं झाला मृत्यू

भयंकर! जॉगिंगला गेलेल्या तरुणीचे भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके, वेदनेनं झाला मृत्यू

रोजच्याप्रमाणं जॉगिंगसाठी गेलेल्या (Girl died in dog attack) तरुणीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.

रोजच्याप्रमाणं जॉगिंगसाठी गेलेल्या (Girl died in dog attack) तरुणीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.

रोजच्याप्रमाणं जॉगिंगसाठी गेलेल्या (Girl died in dog attack) तरुणीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.

  • Published by:  desk news

अर्जेंटिना, 3 नोव्हेंबर : रोजच्याप्रमाणं जॉगिंगसाठी गेलेल्या (Girl died in dog attack) तरुणीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. भारतात अनेक शहरांमध्ये भटक्या (Fear of stray dogs in the cities) कुत्र्यांची समस्या बघायला मिळते. अनेकदा रस्त्याने एकट्याने जाणाऱ्या लहान मुलांवर आणि महिलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ले करण्याच्या घटना घडतात. मात्र भटक्या कुत्र्यांचा हा त्रास केवळ भारतातच आहे असं नाही. तर जगातील इतर देशांतही असेच प्रकार घडत असल्याचं या भयंकर घटनेतून दिसून आलं आहे.

जॉगिंग करताना हल्ला

अर्जेंटिनात राहणारी फ्लोरेंसिया लेडेसमा ही तरुणी रोजच्याप्रमाणं जॉगिंग शूज घालून धावण्यासाठी बाहेर पडली होती. तिच्या नहमीच्या मार्गानं धावत ती मैदानात पोहोचली. मैदानात एक वेढा मारून परत घराकडं फिरण्याचा तिचा प्लॅन होता. मात्र या मैदानात काही भटके कुत्रे बसले होते. फ्लोरेंसिया तिथं पोहोचली, तेव्हा मैदानात कुणीच नव्हतं. धावणाऱ्या फ्लोरेंसियावर सहा ते सात भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केला आणि तिला खाली पाडलं. त्यानंतर कुत्र्यांनी तिच्या शरीराचे लचके तोडायला सुरुवात केली. पूर्ण ताकदीनिशी तिने कुत्र्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र कुत्र्यांनी एकत्रित केलेल्या हल्ल्यामुळे तिला काहीच करता येईना.

भावाला केला फोन

त्याही परिस्थितीत तिने खिशातील फोन काढत भावाला फोन केला आणि त्याला परिस्थितीची कल्पना दिली. भावाने वेगाने घटनास्थळी पोहोचत कुत्र्यांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर कुत्रे घाबरून पळून गेले. मात्र तोपर्यंत फ्लोरेंसिया गंभीर जखमी झाली होती. चावून चावून कुत्र्यांनी तिच्या शरीराचे लचके तोडले होते. आपली बहीण त्यावेळी केवळ पाणी मागत होती, असं तिच्या भावाने सांगितलं.

हॉस्पिटलमध्ये मृत्यू

भावानं तिला तातडीनं जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं, मात्र तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका तरुणीचा हकनाक बळी गेल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Attack, Death, Dog