स्कर्ट घातला म्हणून सौदी अरेबियात मुलीला अटक

स्कर्ट घातला म्हणून सौदी अरेबियात मुलीला अटक

स्कर्ट घालणे सौदी अरेबियाच्या इस्लामिक मतांच्या विरूद्ध असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

  • Share this:

19जुलै:सौदी अरेबियात एका मुलीला स्कर्ट घालणं चांगलंच महागात पडलंय. स्कर्ट घातल्यामुळे तिला पोलिसांनी अटक केली आहे. स्कर्ट घालणे सौदी अरेबियाच्या इस्लामिक मतांच्या विरूद्ध असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मुलीच्या व्हिडिओने खळबळ माजवली आहे. अनेक लोकांनी तिच्या स्कर्ट घालण्यावर टीका केलीय तर अनेकांनी तिचे समर्थनही केले आहे. सौदी अरेबियातील एका पत्रकाराने हिचा फोटो ब्लर करून शेअर केला आणि या गोष्टीवर प्रचंड टीकाही केली

अटक झालेल्या या मुलीचं नाव खुलूद असून काही दिवसांपूर्वी मिनी स्कर्ट आणि क्रॉप टॉप घालून हा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

First published: July 19, 2017, 7:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading