Home /News /videsh /

गजब कहानी! 8 वर्ष Dating करूनही बॉयफ्रेंडनं प्रपोज केलं नाही, गर्लफ्रेंडनं ठोकला कोर्टात दावा

गजब कहानी! 8 वर्ष Dating करूनही बॉयफ्रेंडनं प्रपोज केलं नाही, गर्लफ्रेंडनं ठोकला कोर्टात दावा

सलग आठ वर्ष मनोभावे डेटिंग (Girffriend goes to court as boyfriend did not propose her even after dating of 8 years) करूनही बॉयफ्रेंड प्रपोज करत नसल्याचा दावा एका तरुणीनं ठोकला आहे.

    जाम्बिया, 30 ऑक्टोबर: सलग आठ वर्ष मनोभावे डेटिंग (Girffriend goes to court as boyfriend did not propose her even after dating of 8 years) करूनही बॉयफ्रेंड प्रपोज करत नसल्याचा दावा एका तरुणीनं ठोकला आहे. प्रत्येक नातं हे ठराविक काळानंतर पुढे जात असतं. विकसित होत असतं. त्याचप्रमाणं बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडचं नातंही हळूहळू विवाहात (Relation of boyfriend and girlfriend) बदलावं, अशी अनेकांची इच्छा असते. मात्र तब्बल 8 वर्षं डेटिंग करूनही आपला बॉयफ्रेंड अंगठी घेऊन येऊन आपल्याला प्रपोज करत नसल्याच्या रागातून एक तरुणीनं कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला. काय आहे प्रकरण? जाम्बियातील जेरटुड नगोमा नावाची 28 वर्षांची तरूणी हे गेल्या 8 वर्षांपासून हरबर्ट सलाईकी या 30 वर्षांच्या तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघांना एक मूलदेखील आहे. दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. मात्र हरबर्ट काही जेरटुडला प्रपोज करायला तयार नाही. तो एक दिवस आपल्याला प्रपोज करेल, या प्रतीक्षेत जेरटुड आठ वर्षं राहिली. जाम्बियातील वेगळी संस्कृती जाम्बियात लग्नाशिवाय एखादा तरुण आणि तरुणी एकत्र राहू शकतात आणि मुलंदेखील जन्माला घालू शकतात. त्यानुसार या दोघांनी गेल्या आठ वर्षांत एका मुलाला जन्मही दिला. एवढंच नव्हे, तर जेरटुडच्या घरच्यांनी काही वर्षांपूर्वीच हरबर्टला हुंड्याची रक्कमदेखील अदा केली आहे. मात्र तरीही हरबर्टनं अद्याप लग्नाचा विचार केला नसल्याचं चित्र आहे. हे वाचा- अमेरिकेच्या सांगण्यावरुन भारताने चेन्नईमधील ते हेलिकॉप्टर का जप्त केलं? जेरटुड गेली कोर्टात आपण या नात्याल 8 वर्षं देऊनही जर हरबर्ट प्रपोज करत नसेल, तर या नात्याच्या भवितव्याविषयी आपल्याला चिंता वाटत असल्याचं तिनं म्हटलं आहे. तर आपली आर्थिक परिस्थिती अद्याप बेताची असल्यामुळेच आपण लग्नाचा विचार करत नसल्याचं स्पष्टीकरण हरबर्टनं दिलं आहे. न्यायालयानं दोघांनाही शांतपणे यावर विचार करून परस्पर संमतीने तोडगा काढण्याची सूचना केली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Boyfriend, Girlfriend, Relation

    पुढील बातम्या