30 मे : कोण म्हणतं चित्र फक्त माणसंच काढू शकतात? आॅजीला पाहून तरी असं वाटत नाहीय. हा आॅजी आहे तरी कोण? हा आहे तीन वर्षाचा जिराफ. अमेरिकेतल्या नवेडा या सिंहांच्या अभयारण्यात हा जिराफ 'पेंटर' म्हणूनच ओळखला जातो.
13 फुटाचा हा आॅजी आपल्या तोंडात ब्रश घेऊन अभयारण्याच्या दारात चित्र काढत असतो. इथे सिंहांना पाहायला येणारे पर्यटक अगोदर आॅजीला पाहून अचंबित होतात. या अभयारण्याचे अध्यक्ष किथ इवान्स म्हणतात, ' आॅजीला चित्र काढणं आवडतं. पण आम्ही त्याच्यावर जबरदस्ती करत नाही. त्याचा मूड असेल तेव्हाच तो चित्र काढतो.'
34 हजार स्क्वेअर फूट अभयारण्यात प्राणी गुण्यागोविंदानं राहतात. तिथेच हा चित्रकार जिराफ सर्वांचा लाडका बनलाय. तो रोज 20 किलो भाजी खातो. चणेही खातो. चित्र काढून झालं की तो आपल्या मालकाला ब्रश परत करतो.
आॅजीची पेंटिंग्ज विकलीही जातात. अभयारण्यात येणारे पर्यटक ती विकत घेतात. आॅजी 8 महिन्याचा होता तेव्हा त्याला इथे आणण्यात आलं होतं. इथे त्याच्या या उपजत कलेचा सन्मान केला जातोय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा