पंतप्रधान मोदींना चढला फुटबॉलचा ज्वर, 'फिफा'च्या अध्यक्षांकडून मिळाली 'खास' भेट

पंतप्रधान मोदींना चढला फुटबॉलचा ज्वर, 'फिफा'च्या अध्यक्षांकडून मिळाली 'खास' भेट

पंतप्रधानांचं हे फुटबॉलप्रेम पाहून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले फिफा चे अध्यक्ष गियानि इनफेंटिनो यांनी पंतप्रधानांची नंतर भेट घेऊन त्यांना खास गिफ्ट दिलं.

  • Share this:

ब्यूनस आयर्स, 2 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या G20 देशांच्या शिखर परिषदेसाठी अर्जेटिनात आहेत. अर्जेंटिना म्हटल्यावर आठवण येते ती तिथल्या 'फुटबॉल'ची. भारतात जसं क्रिकेटचं वेड त्यापेक्षा जास्त अर्जेंटिनात फुटबॉलचं. पंतप्रधान ज्या देशात जातात त्या देशात भाषण करताना ते आवर्जुन तिथली कला, संस्कृती, खेळ, साहित्य याचा उल्लेख करतात.

अर्जेंटिनात पोहोचल्यावर पंतप्रधान तिथल्या 'योग फॉर पीस' या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी इथल्या लोकांच्या फुटबॉलच्या प्रेमाचा आठवणीने उल्लेखही केला होता. भारताच्या कला, संस्कृतीची जर अर्जेटिनाला आवड आहे तर इथल्या फुटबॉलचं आकर्षण भारतीयांना आहे.

पंतप्रधानांचं हे फुटबॉलप्रेम पाहून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले फिफा चे अध्यक्ष गियानि इनफेंटिनो यांनी पंतप्रधानांची नंतर भेट घेऊन त्यांना खास गिफ्ट दिलं. हे गिफ्ट होतं पंतप्रधानांच नाव असलेली खास जर्सी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटकरून या भेटीबद्दल माहिती दिली आणि ही आगळीवेगळी भेट दिल्याबद्दल गियानी यांचे आभारही मानले.

भारतात होणार G20

देशातल्या 19 औद्योगिक देशांना आणि युरोपीयन युनियनला जोडणारी G20 ही महत्वाची संघटना आहे. अर्जेटिनाची राजधानी ब्यूनस आयर्स इथं सुरू असलेल्या G20 देशांच्या शिखर परिषदेत भारताच्या मुत्सद्देगिरील यश आलंय. 2022 मध्ये होणाऱ्या शिखर परिषदेचं यजमानपद भारताला देण्याच्या निर्णयाला सर्व देशांनी मान्यता दिली आहे. आधी ही परिषद इटलीला होणार होती.

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत इटलीनं भारताची विनंती मान्य केली. 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूण होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर भारताला या परिषदेचं यजमानपद हवं होतं.

भारताच्या स्वातंत्र्याला 2022 मध्ये 75 वर्ष पूर्ण होत आहेत.

स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त G20 परिषद घेण्याचा मान भारताला मिळावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. रोटेशननुसार ही परिषद इटलीला होणार होती. मात्र भारताच्या विनंतीला मान देत इटलीने यासाठी तयारी दाखवली आणि इतर सदस्य देशांनीही त्याला मान्यता दिली. आधीच्या योजनेनुसार 2021 मध्ये भारतात ही परिषद होणार होती.

ही मान्यता मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आम्ही जगभरातल्या नेत्यांचं स्वागत करण्यास उत्सुक आहोत. सर्वांना मी भारतात येण्याचं निमंत्रण देतो. भारत हा जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे.

भारतात या, इथल्या आदरातिथ्याचा अनुभव घ्या असंही पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. भारताच्या मुत्सद्देगिरीचं हे मोठं यश समजलं जातं. जगातली सर्व विकसनशील देश या परिषदेचे सदस्य असून जगभरातले सर्व मोठे नेते या परिषदेला हजेरी लावत असतात.

 

VIDEO : अबब! मानवी वस्तीत घुसला भलामोठा अजगर आणि...

First published: December 2, 2018, 1:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading