जर्मनीमध्ये चक्क बीअरची पाईपलाईन...!

जर्मनीमध्ये चक्क बीअरची पाईपलाईन...!

  • Share this:

12 जून : पाण्याची पाईपलाईन आपल्याला माहिती असेलच, शहरवासियांना तर गॅसची पाईपलाईनही माहिती असेल पण सध्या जर्मनीतल्या एका पाईपलाईनची जोरदार चर्चा आहे. ती म्हणजेच बीअरची पाईपलाईन. जर्मनीत 3 ते 5 ऑगस्टला वाकेन ओपन एअर हार्ड रॉक फेस्टिवल आहे. हा जगातला सगळ्यात मोठा संगीत महोत्सव मानला जातो. या महोत्सवात येणाऱ्या पर्यटकांसाठी ही खास पर्वणी असणार आहे. संगीत रसीकांना जेव्हा हवं तेव्हा ते नळ सुरू करून हवं तेवढ्या बीअरचा आनंद घेऊ शकतील.

या पाईपलाईनमार्फत दर 6 सेकंदांनी बीअरचे 6 ग्लासेस भरले जातील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. महोत्सवाच्या तीनही दिवसात प्रेक्षकांना थंड बीअर मिळण्यासाठी ही जवळपास 7 किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. मेगाडेथ, अॅलीस कूपर आणि ट्रिव्हियम या ब्रँड्सचा समावेश आहे. साधारण 75 हजार लोक या महोत्सवासाठी उपस्थित राहतील असा अंदाज आहे.

महोत्सव होणारं ठिकाण हे श्लेसविग- होलस्टाईन या गावात आहे. 3 ते 5 ऑगस्ट या दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात 150 बँड्स आविष्कार सादर करणार आहे. प्रत्येकजण साधारणपणे 5.1 लीटर बीअर पिऊ शकेल असाही अंदाज आहे. हा महोत्सव जास्तीत जास्त लोकप्रिय होण्यासाठी आणि फायदेशीर ठरण्यासाठी ही पाईपलाईन टाकली जातेय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पाईपलाईनमध्ये आणि आसपास कमालीची स्वच्छता राखण्यात येतीये.

बीअरशिवाय या जागेवर पाण्याची पाईपलाईनही टाकण्यात येणार आहे. त्यातून तिथं असणारा कचरा, सांडपाणी स्वच्छ केलं जाईल. हे ऐकून आपल्याकडेही अशाप्रकारची पाईपलाईन टाकता येईल का असा विचार नक्कीच सुरू झाला असेल. सध्या जरी ते शक्य नसलं तरी पुढे कधीतरी होईल अशी आशा बाळगायला काय हरकत आहे?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2017 01:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading