Home /News /videsh /

खळबळजनक! माणसानंतर आता कुत्र्यालाही झाला कोरोना, 'या' देशात आरोग्य विभागानं दिले मारून टाकण्याचे आदेश

खळबळजनक! माणसानंतर आता कुत्र्यालाही झाला कोरोना, 'या' देशात आरोग्य विभागानं दिले मारून टाकण्याचे आदेश

तबब्ल 1 कोटीहून अधिक लोकांचा कोरोनाची लागण झाली आहे. आता माणसांबरोबरच प्राण्यांमध्येही कोरोनाचा धोका वाढू लागला आहे.

    अटलांटा, 04 जुलै : कोरोनानं जगभरात थैमान घातले आहे. तबब्ल 1 कोटीहून अधिक लोकांचा कोरोनाची लागण झाली आहे. आता माणसांबरोबरच प्राण्यांमध्येही कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या जॉर्जिया प्रांतात (Georgia Province Of America)कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एक कुत्रा आढळला आहे. असे सांगितले जात आहे की, कोरोनाचा लागण झालेला हा दुसरा कुत्रा असावा. जॉर्जियाच्या आरोग्य विभागाने बुधवारी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की सहा वर्षीय मिश्र जातीच्या कुत्र्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. याआधी त्याच्या मालकास कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर कुत्र्याची चाचणी करण्यात आली. वाचा-अनलॉक 2.0 मध्ये कोरोनाचा विस्फोट, गेल्या 24 तासांत रुग्णांनी मोडले सर्व रेकॉर्ड धक्कादायक बाब म्हणजे कुत्र्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर त्याला ठार मारण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुत्र्याला न्यूरोलॉजिकल नावाचा रोग झाला होता. या रोगाचा आणि कोव्हिड-19चा संबंध नाही. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आतापर्यंत उपलब्ध असलेल्या मर्यादित माहितीच्या आधारे पाळीव प्राण्यांपासून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा धोका खूपच कमी आहे. जगभरात कोरोनाचा थैमान दुसरीकडे जगभरात कोरोनानं हाहाकार माजला आहे. सध्या जगातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 करोड़ 19 लाख 09 हजार 678 झाली आहे. यातील 62 लाख 97 हजार 610 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, 5 लाख 29 हजार 113 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये गेल्या 24 तासांत 42 हजार 223 नवीन रुग्ण आढळून आले. वाचा-VIDEO : मास्क न घालण्यावरून झाला वाद, भाजप नेत्यानं पोलिसांना केली मारहाण भारतातही कोरोनाबाधितांची संख्या वाढली देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा हा 20 हजारांच्या पुढे जात आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 22 हजार 771 नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतचा हा सर्वात जास्त आकडा आहे. देशात सध्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 6 लाख 48 हजार 315 झाली आहे. तर, 24 तासांत 442 जणांचा मृत्यू झाला. यासह मृतांचा एकूण आकडा 18 हजार 655 झाला आहे. देशात सध्या 2 लाख 35 हजार 433 सक्रीय रुग्ण आहेत. तर, 3 लाख 94 हजार 227 रुग्ण निरोगी झाले आहेत. वाचा-'पुणे तिथे काय उणे!' खरेदी केला साडेपाच तोळ्याचा सोन्याचा मास्क, एवढी आहे किंमत संपादन-प्रियांका गावडे.
    First published:

    Tags: Corona, Corona virus, Coronavirus

    पुढील बातम्या