सोन्याच्या शवपेटीतून जॉर्ज फ्लोईड यांना अखेरचा निरोप, किंमत वाचून विश्वास बसणार नाही

सोन्याच्या शवपेटीतून जॉर्ज फ्लोईड यांना अखेरचा निरोप, किंमत वाचून विश्वास बसणार नाही

मायकल जॅक्सन, जेम्स ब्राऊननंतर जॉर्ज फ्लॉइड हे तिसरे व्यक्ती आहेत ज्यांना सोन्याच्या शवपेटीतून नेण्यात आलं

  • Share this:

ह्यूस्टन, 11 जून: अमेरिकेतील पोलीस अधिकाऱ्याच्या निर्दयीपणाचा बळी झालेले जॉर्ज फ्लोईड यांच्या हत्येनं क्रांती घडवून आणली. जॉर्ज फ्लोईड यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आईच्या कब्रीशेजारी त्यांना दफन करण्यात आलं. 'जगाला त्याची आठवण होईल. तो संपूर्ण जग बदलणार आहे'. असं पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप देताना जॉर्ज यांचे भाऊ रॉड यांनी आपली भावाना व्यक्त केली आहे.

जॉर्ज यांचं पार्थिव नेण्यासाठी खास सोन्याची शवपेटी तयार करण्यात आली होती. मायकल जॅक्सन, जेम्स ब्राऊननंतर जॉर्ज फ्लोईड हे तिसरे व्यक्ती आहेत ज्यांना सोन्याच्या शवपेटीतून नेण्यात आलं आहे. या सोन्याची शवपेटीची किंमत साधारण 25 हजार डॉलर एवढी आहे. जॉर्ज यांच्या मृत्यूनंतर जगभरातून मदत येत होती. त्यातून ही शवपेटी तयार केल्याचंही सांगितलं जात आहे.

जॉर्ज फ्लोईड यांच्या शोकसभेला तुफान गर्दी होती. तर अंत्ययात्रेतही भर उन्हात नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. जड अंत:करणाने सर्वांनी जॉर्ज यांना अखेरचा निरोप दिला. कोरोनाचा पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि फेसमास्कचं पालन नागरिकांनी केलं होतं.

परलॅड या उपनगरातील दफनभूमीत शेवटचे एक मैल अंतर हे फ्लोईड यांचं पार्थिव पांढऱ्या रंगाच्या अश्‍वरथातून नेण्यात आलं. त्यांनंतर चर्चासमोर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जॉर्ज यांचं पार्थिव आईच्या कब्रीजवळ दफन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 11, 2020, 12:20 PM IST
Tags: world news

ताज्या बातम्या