George Floyd Death Protest : असं काय झालं की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प झाले अंडरग्राउंड? वॉशिंग्टनसह 40 शहरांमध्ये कर्फ्यू

George Floyd Death Protest : असं काय झालं की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प झाले अंडरग्राउंड? वॉशिंग्टनसह 40 शहरांमध्ये कर्फ्यू

आतापर्यंत वॉशिंग्टनसह 40 शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे तर 1500हून अधिक निदर्शकांना अटक करण्यात आली आहे. या निदर्शनाची झळ आता व्हाइट हाऊसपर्यंत पोहचली आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 01 जून: कोरोनाच्या संकटानं साऱ्या जगाला हादरून सोडलं आहे, मात्र अमेरिकेत सध्या एका वेगळ्याच कारणांमुळं संपूर्ण देश तापला आहे. देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्रम्प यांना अंडरग्राउंड बंकरमध्ये जाण्याची वेळ आली. या सगळ्या मागचं कारण आहे अमेरिकेतील मिनियापोलीस इथं जॉर्ज फ्लॉईड (47 वर्ष) या कृष्णवर्णीय नागरिकाचा झालेला मृत्यू. जॉर्ज यांचा पोलीस अधिकाऱ्यानं हत्या केल्याचा आरोप आहे, याच विरोधात अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये उग्र निदर्शनं सुरू झाली आहेत. आतापर्यंत वॉशिंग्टनसह 40 शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे तर 1500हून अधिक निदर्शकांना अटक करण्यात आली आहे. या निदर्शनाची झळ आता व्हाइट हाऊसपर्यंत पोहचली आहे.

शुक्रवारी व्हाईट हाऊसच्या बाहेर मोठ्या संख्येनं निदर्शक एकत्र आले त्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षेसाठी बंकर येथे नेण्यात आले. माध्यमांच्या माहितीनुसार, अचानक विरोधकांच्या जमावामुळे व्हाइट हाऊसमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्यानंतर ट्रम्प यांनाही बंकरमध्ये लपवावे लागले. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, ट्रम्प 1 तासाहून अधिक काळ बंकरमध्ये थांबले होते. सुरक्षा प्रोटोकॉल अंतर्गत अशा परिस्थितीत अध्यक्षांचे संपूर्ण कुटुंब एका बंकरमध्ये हलवले गेले. यानंतर पोलिसांनीही निदर्शकांना अटक करण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी अश्रू गळती व फ्लॅश बँग उपकरणांचा वापर सुरू केल्यावर पोलीस व निदर्शक यांच्यातील वादाला हिंसक वळण आलं. यामुळे व्हाइट हाऊससमोर हिंसाचारासारखी परिस्थिती निर्माण झाली. हे निदर्शक व्हाइट हाऊससमोर जमले आणि बॅनर व पोस्टर्स लावून घोषणाबाजी केली.अमेरिकन पोलिसांच्या क्रौर्याविरोधात रविवारी निदर्शकांनी निषेध करण्यास सुरूवात केली तेव्हा राजधानी वॉशिंग्टनमध्ये कर्फ्यू लावण्यात आला. या निदर्शनात हॉलिवूड सेलिब्रिटींसह संगीतकार, गायक यांनीही आपला सहभाग नोंदवला.

काय आहे प्रकरण

जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय नागरिकाला पोलिसांनी 20 डॉलरची खोटी नोट एका दुकानात चालवल्याप्रकरणी अटक केली होती. 25 मे रोजी मिनेसोटा राज्यातील मिनिआपोलिस शहरात पोलिसांकडून अटक केली जात असताना जॉर्ज यांचा मृत्यू झाला. त्यानंतर जॉर्ज यांना गळ्यावर गुडघा ठेवून बसलेल्या एका पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल झाला. यामध्ये जॉर्ज मला श्वास घेता येत नसल्याचं पोलिसांना सांगताना दिसत आहेत. तरी, पोलिसांनी गळ्यावर गुडघा जोरात दाबला, यातच जॉर्ज यांचा मृत्यू झाला. दरम्यान या पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकरामुळं पुन्हा एका अमेरिकेत पोलिसांकडून कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फुटली आहे.

G-7 परिषद देखील पुढे ढकलली

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जी -7 शिखर परिषद सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. तसेच, जगातील अव्वल अर्थव्यवस्था, जी 10 किंवा जी 11 या देशांच्या या गटात भारत आणि अन्य तीन देशांच्या समावेशासह या 'जुन्या' गटाचा विस्तार करण्याची इच्छा व्यक्त केली जाते.

संकलन, संपादन-प्रियांका गावडे.

First published: June 1, 2020, 12:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading