मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

LIVE शो दरम्यान झालेला बॉम्बब्लास्ट कॅमेऱ्यात कैद; अंगावर शहारा आणणारा VIDEO

LIVE शो दरम्यान झालेला बॉम्बब्लास्ट कॅमेऱ्यात कैद; अंगावर शहारा आणणारा VIDEO

दर वेळेप्रमाणेच आपापल्या तीर्थस्थळांबद्दलच्या वादग्रस्त दाव्यांमुळे हा वाद उफाळून आला आहे. इस्रायली (Israeli) आणि पॅलेस्टिनी (Palestinian) या दोघांकडून परस्परांवर हल्ले सुरू आहेत.

दर वेळेप्रमाणेच आपापल्या तीर्थस्थळांबद्दलच्या वादग्रस्त दाव्यांमुळे हा वाद उफाळून आला आहे. इस्रायली (Israeli) आणि पॅलेस्टिनी (Palestinian) या दोघांकडून परस्परांवर हल्ले सुरू आहेत.

दर वेळेप्रमाणेच आपापल्या तीर्थस्थळांबद्दलच्या वादग्रस्त दाव्यांमुळे हा वाद उफाळून आला आहे. इस्रायली (Israeli) आणि पॅलेस्टिनी (Palestinian) या दोघांकडून परस्परांवर हल्ले सुरू आहेत.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 13 मे: ख्रिश्चन, इस्लाम आणि ज्यू या तीन धर्मांची पवित्र तीर्थस्थळं असलेल्या जेरुसलेममध्ये (Jerusalem) पुन्हा हिंसाचार पेटला आहे. दर वेळेप्रमाणेच आपापल्या तीर्थस्थळांबद्दलच्या वादग्रस्त दाव्यांमुळे हा वाद उफाळून आला आहे. इस्रायली (Israeli) आणि पॅलेस्टिनी (Palestinian) या दोघांकडून परस्परांवर हल्ले सुरू आहेत.

गाझामधून पॅलेस्टिनी बंडखोरांनी (Militant) इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. तसंच, इस्रायलनेही त्यांना मंगळवारी पहाटे हवाई हल्ल्यांनी प्रत्युत्तर दिलं. जेरुसलेममध्ये वाढत असलेला तणाव आणि तिथल्या पवित्र मशिदीत झालेल्या वादांचं रूपांतर या हल्ल्यांमध्ये झालं.

गाझामध्ये एका रात्रीत नऊ मुलांसह एकूण 24 जणांचा बळी गेला. त्यातले बहुतांश जण  इस्रायलच्या (Israel) हल्ल्यात मृत्युमुखी पडले. तसंच, जेरुसलेममध्ये इस्रायलच्या सुरक्षा फौजांबरोबर झालेल्या वादांमध्ये 24 तासांत 700हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक जखमी झाले आहेत. त्यापैकी 500 जणांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तसंच, मंगळवारी सकाळी पॅलेस्टिनी लोकांकडून झालेल्या रॉकेट हल्ल्यात इस्रायलचे सहा नागरिक जखमी झाल्याचं इस्रायलच्या लष्कराकडून सांगण्यात आलं.

अरे बापरे! हे काय भलतंच? टॉन्सिल शस्त्रक्रियेनंतर वेगळ्याच भाषेत बोलू लागली महिला

दोन्ही बाजूंकडून अशा प्रकारे तणाव वाढलेला असताना गाझामध्ये झालेल्या स्फोटाच्या लाइव्ह व्हिडिओची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही क्लिप लंडनमधल्या माया हुसेन नावाच्या कॉमेडियनच्या लाइव्ह शोचा एक भाग आहे. गाझामधल्या (Gaza) स्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी माया हुसेनने (Maya Hussain) हा शो आयोजित केला होता. त्यात चार युझर्स सहभागी झालेले दिसत आहेत. हा शो सुरू असतानाच त्यात सहभागी असलेल्या व्यक्तींपैकी एकाच्या कॅमेऱ्याने तिथला आणखी एक स्फोट टिपला. त्या व्यक्तीच्या घराजवळच हा स्फोट झाला होता. ते पाहून शोमधल्या सर्वांच्याच चेहऱ्यावर भीतीचे भाव दिसले.

View this post on Instagram

A post shared by Maya Hussein (@mayahussein)

माया हुसेनने इन्स्टाग्राम आयजीटीव्हीवर हा व्हिडिओ दोन भागांत शेअर केला आहे. त्यासोबत तिने लिहिलं आहे, 'प्रत्येकाने जागे व्हा. गाझामध्ये हल्ले, स्फोट होत आहेत. पॅलेस्टाइनमधले आपले लोक सुरक्षित नाहीत. ते झोपूही शकत नाहीयेत. त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. आपण एकत्र राहण्याची गरज आहे. हे सर्वांना शेअर करा.'

या दोन्ही व्हिडिओवर मिळून सुमारे 1800 कमेंट्स आल्या आहेत. बुधवारी सकाळी (12 मे) गाझाचं आकाश इस्रायलच्या हल्ल्यांमुळे जणू प्रज्ज्वलित झालं होतं. हमास आणि इस्लामिक जिहादकडून डागली जाणारी रॉकेट्स इस्रायलच्या हवाई दलाकडून मध्येच निष्प्रभ केली जात होती. पॅलस्टिनी बंडखोर गटांकडून शेकडो रॉकेट्स डागण्यात आल्याचं इस्रायलकडून सांगण्यात आलं. इस्रायली नागरिक हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी सैरावैरा पळत होते किंवा रस्त्यांवर झोपत होते. मुस्लिमांचा पवित्र रमजान (Ramadan) महिना सुरू असताना अल् अक्सा मशिदीच्या (Al Aqsa Mosque) आत आणि आजूबाजूच्या परिसरात इस्रायली पोलिस आणि पॅलेस्टिनी निदर्शक यांच्यात वाद झाले. त्यातून तणाव निर्माण झाला आणि मग त्याचं हिंसाचारात रूपांतर झालं.

First published:

Tags: Crime, International, Shocking news, Shocking video viral