• Home
  • »
  • News
  • »
  • videsh
  • »
  • दिल्लीत जडलंं प्रेम, एकमेकांच्या नावाची मेहेंदी काढून नेदरलँड्समध्ये चढले बोहल्यावर! गौरव-प्रणयची अनोखी Love Story

दिल्लीत जडलंं प्रेम, एकमेकांच्या नावाची मेहेंदी काढून नेदरलँड्समध्ये चढले बोहल्यावर! गौरव-प्रणयची अनोखी Love Story

दिल्लीचा गौरव अरोरा (Gaurav Arora) आणि पोलंडचा (Poland) प्रेझ्मेक पावलीकी (Prezmek Pavaliki) उर्फ प्रणय यांची लव्ह स्टोरी सध्या सोशल मीडियावर चर्चत आहे. दिल्लीत सुरू झालेली त्यांची प्रेमकथा अखेर नेदरलँड्समध्ये (Netharlands) त्यांच्या विवाहानं सुफळ संपूर्ण झाली आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर: प्रेमाला कसलंच बंधन नसतं, त्यामुळे जगाच्या पाठीवरील कुठेही कोणालाही आपलं प्रेम, आपला जोडीदार मिळू शकतो. आजकाल प्रेम हे फक्त स्त्री आणि पुरुष यांच्यामध्येच होतं या संकुचित संकल्पनाही दूर होत आहेत. सध्या कुणाच्याही आक्षपाशिवाय दोन पुरुष किंवा दोन स्त्रियाही एकमेकांना जोडीदार म्हणून निवडत आहत. प्रेमाची ताकद सगळ्या अडचणींवर मात करण्याची हिंमत देते. याचंच एक अनोखं उदाहरण आहे दिल्लीच्या गौरव अरोरा (Gaurav Arora) आणि पोलंडच्या प्रेझ्मेक पावलीकी (Prezmek Pavaliki) यांचं. दिल्लीत सुरू झालेली त्यांची प्रेमकथा अखेर नेदरलँड्समध्ये (Netharlands) त्यांच्या विवाहानं (gay couple marriage) सुफळ संपूर्ण झाली आहे. भारतीय समाजात आजही समलिंगी जोडप्यांना (Same sex Couples love Story) स्वीकारण्याची मानसिकता पूर्णपणे विकसित झालेली नाही. तसंच समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यताही नाही. त्यामुळे गौरव आणि प्रेझ्मेक यांनी नेदरलँड्समध्ये जाऊन भारतीय रितीरिवाजानुसार लग्न केलं आहे. एका डेटिंग अॅपद्वारे दिल्लीचा गौरव अरोरा उर्फ गॅरी आणि पोलंडच्या वॉर्साचा रहिवासी असलेला प्रेझ्मेक पावलिकी उर्फ प्रणय (Pranay) यांची ओळख झाली. प्रेझ्मेक पावलिकी दिल्लीत पर्यटनासाठी आला होता. दोघांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं आणि दिल्लीतील हौज खास व्हीलेजमध्ये दोघंही पहिल्यांदा भेटले. त्यांनी काही वेळ एकत्र घालवला. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमातच पडले.
View this post on Instagram

A post shared by _ℙ (@garry_pranay)

प्रेझ्मेक पावलिकी उर्फ प्रणयची पोलंडला परत जाण्याची वेळ आली तेव्हा त्याने गौरवला ख्रिसमससाठी पोलंडला येण्याचं आमंत्रण दिलं. गौरव पोलंडला आल्यानंतर दोघेही एकत्र राहू लागले. 4 वर्षे पोलंडमध्ये राहिल्यानंतर ते अॅमस्टरडॅमला (Amsterdam) गेले. त्यावेळी व्हॅलेंटाईन वीक दरम्यान आपल्या मूळ गावी वॉर्साला परत जात असताना प्रणयने गौरवला प्रपोज केलं. गौरवनेही त्याला लगेच होकार दिला आणि दोघांनी भारतीय पद्धतीनं लग्न करण्याचा निर्णय घेतला. मेहंदी लावण्यापासून ते हळदी, संगीत, होमहवन सगळे विधी त्यांनी केले. दोघांनी आपले पारंपरिक पोशाखातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram

A post shared by _ℙ (@garry_pranay)

दोघेही अत्यंत आनंदी दिसत असून, आपलं प्रेम, आपला जोडीदार मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. दिल्ली आणि पोलंडमधील ही अनोखी प्रेमकहाणी नेदरलँड्समध्ये सफल झाली आहे. लोकांनी या दोघांना विवाहाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
First published: