कुख्यात गँगस्टर रवी पुजारीला आफ्रिकेत अटक

कुख्यात गँगस्टर रवी पुजारीला आफ्रिकेत अटक

पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल देशातून रवी पुजारीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • Share this:

31 जानेवारी : कुख्यात गँगस्टर रवी पुजारीला आफ्रिकन पोलिसांच्या ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल देशातून रवी पुजारीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या 15 वर्षांपासून तो भारताबाहेर आहे.

रवी पुजारीने आजपर्यंत अनेक सेलिब्रिटी, उद्योजक, नेते आणि बिल्डरांना खंडणीसाठी धमकी दिली होती. या प्रकरणी गुप्तचर यंत्रणेनं त्याच्याविरोधात रेड काॅर्नर नोटीस बजावली होती.

2011 ते 2017 च्या काळात त्याने अनेक सेलिब्रिटींना खंडणीसाठी धमक्या दिल्या होत्या. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, प्रिती झिंटा, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनाही रवी पुजारी गँगने धमक्या दिल्या होत्या.

नेस वाडीयांना धमकी

पंजाब इलेव्हन मॅचच्या दरम्यान नेस वाडियाने स्टेडियमवर प्रीतीची छेड काढली होती. प्रीतीने विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. परंतु, तक्रार दाखल होऊन दोन दिवस उलट नाही तेच नेसचे वडील नेसली वाडिया यांनी अंडरवर्ल्डकडून धमकीचा फोन आला. प्रीतीला त्रास देऊ नका आणि नुसली वाडियांनी या प्रकरणात लक्ष देऊ नये, अशी तंबी देण्यात आली होती. हा फोन रवी पुजारी गँगने केला होता असं पोलीस तपासात उघड झालं होतं. मागील वर्षी हे प्रकरण कोर्टात मिटले आहे.

अरिजीत सिंहला धमकी

तसंच बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहला रवी पुजारी गँगकडून धमकी देण्यात आली होती. अरिजीतच्या मॅनेजरला हा धमकीचा फोन आला होता. त्यानंतर अरिजीतने ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली होती. रवी पुजारीने 5 कोटी रुपयांची मागणी केली होती. हे शक्य नसेल तर पुजारीच्या माणसांसाठी दोन शो मोफत करण्याची अट घातली होती.

First published: January 31, 2019, 11:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading