Home /News /videsh /

संतापजनक! तरुणीच्या मृतदेहावर सामूहिक बलात्कार; असा झाला घटनेचा खुलासा

संतापजनक! तरुणीच्या मृतदेहावर सामूहिक बलात्कार; असा झाला घटनेचा खुलासा

फोटो क्रेडिट - अताउल्लाह तरार ट्विटर

फोटो क्रेडिट - अताउल्लाह तरार ट्विटर

काही अज्ञात लोकांनी एका किशोरवयीन मुलीचा मृतदेह (Dead body) कबरीतून बाहेर काढला. तुम्हाला वाचून विश्वास बसणार नाही मात्र, यानंतर त्या तरुणीच्या मृतदेहावर सामूहिक बलात्कार केला. (Gangrape on Dead body)

  पाकिस्तान, 8 मे : दरदिवसा होणारे गुन्ह्यांमध्ये काही गुन्हे (Crime) इतके धक्कादायक असतात की, माणूस कधी कल्पनाही करू शकत नाही. मात्र, तरी या धक्कादायक आणि संतापजनक घटना घडतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही बातमी पाकिस्तानची (Pakistan) आहे. येथे काही अज्ञात लोकांनी एका किशोरवयीन मुलीचा मृतदेह (Dead body) कबरीतून बाहेर काढला. यानंतर त्या तरुणीच्या मृतदेहावर सामूहिक बलात्कार केला. (Gangrape on Dead body) एक, दोन नव्हे तर तब्बल 17 जणांनी हा बलात्कार केला. ही घटना पाकिस्तानातील गुजरातच्या कमला गावात 5 मेला घडली होती. अशी आली ही धक्कादायक घटना समोर -  त्याचवेळी पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएलएन) चे उपमहासचिव अताउल्लाह तरार यांनी 6 मे रोजी ट्विटरवर या घटनेची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, घटनेशी संबंधित 17 संशयितांची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेची वैज्ञानिक पद्धतीने चौकशी करण्यात येत आहे. त्याचवेळी, समोर आलेल्या अहवालानुसार, बुधवार, 4 मे रोजी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग किशोरवयीन मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास नातेवाईकांनी धार्मिक परंपरेनुसार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करून ते घरी परतले. या सर्व प्रकारानंतर मृत मुलीचे नातेवाईक आपापल्या धार्मिक परंपरेनुसार अंत्यसंस्काराच्या दुसऱ्या दिवशी स्मशानभूमी येथे गेले. हेही वाचा - मैत्रीच्या नात्याला काळिमा, अधिकाऱ्याचा मित्राच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार; 2 महिन्यांनी अटक
  त्याचवेळी मृताच्या नातेवाइकांनी कबर खोदली असता त्यांना मृतदेह मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मृतदेहाचा शोध घेतला असता त्यांना काही अंतरावर मृतदेह पडलेला आढळून आला. मृतदेहावर बलात्काराच्या खुणा आढळून आल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, मृत तरुणीच्या काकांनी पोलिसांशी संपर्क साधून एफआयआर दाखल केला आहे. यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. यामध्ये किती नराधम सहभागी होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Dead body, Gang Rape, Pakistan

  पुढील बातम्या