S M L

#बाप्पामोरयारे : आॅस्ट्रेलियाचा रंगतदार गणेशोत्सव

Sonali Deshpande | Updated On: Sep 4, 2017 07:30 PM IST

#बाप्पामोरयारे : आॅस्ट्रेलियाचा रंगतदार गणेशोत्सव

वैभव सोनावणे, 04 सप्टेंबर : दक्षिण गोलार्धातल्या अति दक्षिणेकडे भारतापासून हजारो मैलावर असलेल्या अडेलैडे शहरात भारतीय संस्कृती आणि परंपरेवर प्रेम असलेल्या नागरिकांनी एकत्र येऊन केलेली संघटना म्हणजे युनाइटेड इंडियन्स ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया. भाषा प्रांत धर्म वंश यांच्यावर मात करून भारताच्या प्रति असलेले प्रेम हाच एक धागा घेऊन एकत्र आलेली संघटना म्हणजे UIOSA. आणि या UIOSA च्या आर्टस् अँड कल्चरल गणेश फेस्टिवलचे हे दुसरे वर्ष. भारताबाहेरचा सगळ्यात मोठा भव्य अशी ख्याती असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या राजाचा हा उत्सव, अनेक अंगानी आणि रंगानी वैशिष्ट्यपूर्ण ठरला.

काय आहेत आॅस्ट्रेलियातल्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्य?

१. दोन दिवस चाललेल्या उत्सवाला देशी परदेशी १०००० पेक्षा जास्त भाविकांची आणि अभ्यागतांची हजेरी. (ऑस्ट्रेलिया मध्ये एका मोठ्या शहराची लोकसंख्या तेवढी असते.)२. दोन दिवस आगमनाची मिरवणूक, मराठी आणि अन्य भाषांच्या आरत्या, अथर्वशीर्ष पठण, सत्य नारायण पूजा, हवन, शंखनाद, नैवेद्य, महाप्रसाद अश्या सर्व पारंपारिक विधीचे यथायोग्य पालन. - हजारोंच्या उपस्थितीत आरत्या आणि १२० पेक्षा जास्त दाम्पत्यांची सत्यनाराय पूजा, १०८ वेळा अथर्वशीर्षाचे पारायण.

३. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यात जवळपासच्या शहरांचे महापौर, सांसद, मंत्री, कौन्सिल अध्यक्ष, जवळ जवळ सर्व प्रमुख देशांच्या संघटनेचे मान्यवर उदा. भूतानी, नेपाळी, चिनी, इराकी, अफगाणी ई. त्याच बरोबर भारतीय ४४ संघटनांचे प्रतिनिधी उदा. कन्नड असोसिएशन, उत्तराखंड, पंजाबी, गुजराथी, मराठी, बंगाली, मल्याळी, तामिळीं ई. या सर्वांची केवळ उपस्थितीत नाही तर त्यांचा सर्व कामात हिरीरीने सहभाग.

४. दोन दिवस १६ तासापेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल- एकूण १३५ पेर्फोर्मन्सस, शास्त्रीय नृत्य बरोबर बॉलीवूड, हिपहॉप, पारंपरिक इटालियन, जपानी, ग्रीक, चिनी, आफ्रिकन, ऑस्ट्रेलियन मूलनिवासी ई. नृत्य प्रकार.

Loading...
Loading...

५. सगळ्यात आकर्षक ठरले ते मराठी पारंपरिक वेशात फेटा आणि महिलांनी नऊवारी नेसून वाजवलेला ढोल ताशा चा गजर, सगळा आसमंत दुमदुमत होता.... आणि त्यात इंद्र जिमी ची ललकारी, शिवाजी महाराजांचा जयजयकार हा उत्साहाचा परमोच्च बिंदू.

६. ढोल ताशाबरोबर विशेष आकर्षण होते ते लेझिमीचे, ऑस्ट्रियातल्या तरुणांचा त्यात अवर्णनीय सहभाग, ३०- ४० जणांच्या लेझीम पथकात व्यवस्थेत असलेले ऑस्ट्रेलियन सुरक्षा रक्षक आपल्या ऑफिसरबरोबर आणि स्थानिक सांसदांबरोबर सहभागी.

७. ३०० पेक्षा जास्त स्वयंसेवक दिवस रात्र झटून कार्यक्रम यशस्वी करण्यात सहभागी. विना तक्रार चाललेल्या कार्यक्रमाच्या नियोजनाला आतापर्यंत फेसबुकवर ५ पैकी ५ स्टार मिळाले आहेत.  भारतात बसलेल्या नातेवाईकांसाठी फेसबुक लाईव्ह ची सोय होती.

८. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे गणपती साठी खास ऑस्ट्रेलियात लिहिलेल्या, संगीत दिलेल्या, ऑस्ट्रियातल्या गायकांनी गायलेल्या, असूट्रियात रेकॉर्ड केलेल्या  गाण्यांच्या अल्बम चे प्रकाशन पुण्यात पुयच्या महापौर आणि टिळकांच्या वंशज सौ. मुक्ता टिळक यांच्या हस्ते संपन्न. ऑस्ट्रेलियात वाढलेल्या लहान मुलांनी गायलेले बालगीत खूप प्रसिद्ध.

९. कार्यक्रमाचे कौतुक महाराष्ट्राचे माननीय सांस्कृतिक मंत्री विनोदजी तावडे, मुख्यामंत्री देवेन्द्रजी फडणवीस, भारताच्या सांस्कृतिक मंत्री स्मृती इराणी, विदेश मंत्री सुषमा स्वराज आणि गृह मंत्री राजनाथजी सिंह यांनी पात्र द्वारे कळवले आहे. अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ यांच्या कडून प्रथमच भारता बाहेरच्या मंडळाला सभासद म्हणून आणि गणपतीला ऑस्ट्रेलिया चा राजा म्हणून मान्यता.

१०. संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि स्वयंसेवकांबरोबर अध्यक्ष सदानंद मोरे, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी आणि प्रसिद्धी प्रमुख मिहीर शिंदे आणि भारतातील प्रतिनिधे राजेंद्र झेंडे यांचे विशेष कौतुक.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2017 07:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close