पाकिस्तानला 440 व्होल्टचा झटका; काश्मीर प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

जम्मू-काश्मीर संदर्भातील कलम 370 आणि कलम 35 A वरून आंतरराष्ट्रीय पातळीवर थयथयाट करणाऱ्या पाकिस्तानला आज आणखी एक मोठा दणका बसला आहे.

जम्मू-काश्मीर संदर्भातील कलम 370 आणि कलम 35 A वरून आंतरराष्ट्रीय पातळीवर थयथयाट करणाऱ्या पाकिस्तानला आज आणखी एक मोठा दणका बसला आहे.

  • Share this:
    पॅरिस, 26 ऑगस्ट: जम्मू-काश्मीर संदर्भातील कलम 370 आणि कलम 35 A वरून आंतरराष्ट्रीय पातळीवर थयथयाट करणाऱ्या पाकिस्तानला आज आणखी एक मोठा दणका बसला आहे. फ्रान्स(France)मध्ये सुरु असलेल्या जी-7 शिखर परिषदेत (G7 Summit) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump)यांची चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात काश्मीर संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ट्रम्प यांनी केवळ काश्मीरच नव्हे तर भारत पाकिस्तान या दोन्ही देशातील सर्व प्रश्न हे द्वीपक्षीय असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले. जी-7सारख्या परिषदेच्या व्यासपीठावरून ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्न द्वीपक्षीय असल्याचे सांगून पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. ट्रम्प यांच्या या विधानाचा मथितार्थ असा होतो की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणत्याच विषयात अमेरिका लक्ष घालणार नाही. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला होता. हा विषय आंतरराष्ट्रीय करण्यासाठी पाकिस्तानने जंग जंग पछाडले. यासाठी त्यांनी चीनने देखील मदत केली. पण संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानचा हा आवाज कोणीच ऐकूण घेतला नाही. जगातील सर्व देशांनी काश्मीर संदर्भातील हा निर्णय भारताचा अंतर्गत विषय असल्याचे मान्य केले. इतक नव्हे तर संयुक्त राष्ट्र संघाने यासंदर्भात निवेदनही जाहीर केले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर जी-7 शिखर परिषदेत मोदी-ट्रम्प यांच्या भेटीत काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानच्या उरलेल्या आशा देखील संपुष्ठात आल्या. दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. मला आशा वाटते की भारत आणि पाकिस्तान हा मुद्दा चर्चेने सोडवतील. मोदी नक्कीच पाकिस्तानशी बोलतील आणि ते नक्कीच यातून चांगला मार्ग काढतील. आम्ही काश्मीर प्रश्नावर काल रात्रीच चर्चा केली. पंतप्रधान मोदींना खरोखर वाटते की परिस्थिती नियंत्रणात आहे. ते पाकिस्तानशी बोलून प्रश्न सोडवतील. मोदी म्हणाले... काश्मीर संदर्भात पत्रकारांनी विचारले असता मोदी म्हणाले, भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक प्रश्न आहेत. काश्मीर हा त्यापैकी एक आहे. हे सर्व प्रश्न द्विपक्षीय आहेत. या विषयावर आम्हाला अन्य कोणत्याही देशाला त्रास द्यायचा नाही. VIDEO : नाना पटोलेंनी काढले मुख्यमंत्री कार्यालयाचे वाभाडे, भाजपच्या गोटात खळबळ
    Published by:Akshay Shitole
    First published: