मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

'या' अमेरिकन नागरिकांना मास्क वापरण्याची गरज नाही, बायडेन यांची घोषणा

'या' अमेरिकन नागरिकांना मास्क वापरण्याची गरज नाही, बायडेन यांची घोषणा

संपूर्ण जग सध्या कोरोना संकटाचा (Coronavirus) सामना करत आहे. त्याचवेळी अमेरिकेची (USA) पुन्हा एकदा सामान्य परिस्थितीकडं वाटचाल सुरु झालीय.

संपूर्ण जग सध्या कोरोना संकटाचा (Coronavirus) सामना करत आहे. त्याचवेळी अमेरिकेची (USA) पुन्हा एकदा सामान्य परिस्थितीकडं वाटचाल सुरु झालीय.

संपूर्ण जग सध्या कोरोना संकटाचा (Coronavirus) सामना करत आहे. त्याचवेळी अमेरिकेची (USA) पुन्हा एकदा सामान्य परिस्थितीकडं वाटचाल सुरु झालीय.

  • Published by:  News18 Desk

वॉशिंग्टन, 14 मे: संपूर्ण जग सध्या कोरोना संकटाचा (Coronavirus) सामना करत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.देशातील बहुतेक राज्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. आरोग्य व्यवस्थेवरचा ताण देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचवेळी अमेरिकेत पुन्हा एकदा सामान्य परिस्थिती येण्याची चिन्ह आहेत.

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये अमेरिकेचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे अमेरिकेत दहशतीचं वातारवण आहे. अमेरिकीतल ही परिस्थिती आता निवळणार आहे. कारण, आता  ज्या नागरिकांचं लसीकरण (vaccination) पूर्ण झालंय, त्यांनी मास्क वापरण्याची गरज नाही, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी केली आहे.

बायडेन यांनी यावेळी बोलताना सीडीसी (Centers for Disease Control and Prevention) ने जाहीर केलेल्या नियमावलींची माहिती दिली. सीडीसीनं कोरोना व्हॅक्सिन घेतल्या लोकांनी मास्क घालण्याची किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज नसल्याचं जाहीर केले. मात्र त्याचवेळी ज्यांचं अजून लसीकरण झालेलं नाही, अशा नागरिकांनी मास्क घालणे बंधनकारक असल्याचे निर्देश सीडीसीनं दिले आहेत.

सीडीसीच्या या घोषणेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरीस (Kamala Harris) यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी या दोघांनीही मास्क घातला नव्हता. "माझ्या मते ही एक मोठी उपलब्धी आहे. अमेरिकेतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात व्हॅक्सिन घेतल्यानं हे यश मिळालंय. एका वर्षाची कठोर मेहनत आणि अनेकांचा गमावल्यानंतर आपण मास्क फ्री च्या दिशेनं वाटचाल करत आहोत. कोरोना लस घ्या किंवा मास्क वापरा इतका सोपा आपला नियम आहे. " असे बायडेन यांनी सांगितले.

पृथ्वीवरील लाईफलाईन! या ठिकाणी मिळतोय जगातला 20 टक्के ऑक्सिजन

अमेरिकेत आतापर्यंत 3 कोटी 36 लाख 15 हजारांपेक्षा जास्त कोरोना केसेस आढळल्या आहेत. यापैकी 5 लाख 98 हजार जणांचा मृत्यू झालाय. अमेरिकेत सध्या 63 लाख 58 हजारांहून जास्त कोरोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर 2 कोटी 66 लाखांहून जास्त रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

First published:

Tags: Coronavirus, Joe biden, United States of America